आजपासून पुन्हा निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:19 AM2021-06-28T04:19:56+5:302021-06-28T04:19:56+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या नव्या स्वरूपातील डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लादण्यात आले आहेत. आजपासून सकाळी ७ ते दुपारी ...
चंद्रपूर : कोरोनाच्या नव्या स्वरूपातील डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लादण्यात आले आहेत. आजपासून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवता येणार आहे. शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद ठेवावे लागणार आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन केल्यास दंड थोटावण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक निर्बंध लागू केले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूने बाधित रुग्ण राज्यात आढळून येत आहेत. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात असे रुग्ण नसले तर, प्रादुर्भाव होण्यापूर्वीच दक्षता घेतली जात आहे. या विषाणूच्या संक्रमणाचा दर जास्त असल्याने विषाणूमधील बदल आणि त्यापासून होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लादण्यात आले आहेत.
उद्या (दि.२८) पासून अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर शनिवार तसेच रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून सर्व बंद राहणार आहे.
बाॅक्स
व्यावसायिकांमध्ये नाराजी
मागील वर्षभरापासून कोरोनाने व्यवसाय ठप्प पडल्यासारखेच आहे. त्यातच एप्रिल, मे महिन्यामध्ये लाॅकडाऊन करण्यात आल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. निर्बंध उठल्यानंतर व्यवहार सुरू करण्यात आले. मात्र आता पुन्हा निर्बंध लादण्यात आल्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थिती केला आहे.
बाॅक्स
हाॅटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान
नव्या निर्बंधामुळे हाॅटेल व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे. सोमवार ते शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह तसेच त्यानंतर केवळ पार्सल सेवा सुरू ठेवता येणार आहे. त्यामुळे सायंकाळी होणारा व्यवसाय पुन्हा ठप्प पडणार आहे. परिणामी नोकर वर्गांवर बेरोजगार होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
बाॅक्स
आठवडीबाजार बंदच राहणार
एप्रिल महिन्यामध्ये लाॅकडाऊन करण्यात आल्यानंतर आठवडी बाजारही बंदच होते. दरम्यान, या बाजारासंदर्भात कोणताही निर्णय प्रशासनाने घेतला नव्हता. असे असले तरी काही तालुक्यातील आठवडी बाजार भरत होते. आता नव्या नियमानुसार या बाजारासंदर्भात कोणताही निर्णय नसल्यामुळे आठवडी बाजारही तूर्तास बंदच राहणार राहणार आहे.
बाॅक्स
असा होणार दंड
नियमांचे उल्लंघन केल्यास पहिल्या चुकीसाठी पाच हजार, दुसऱ्या चुकीसाठी दहा हजार तिसऱ्यांदा २० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सदर आदेश आजपासून लागू राहणार आहे.
बाॅक्स
महापालिका, महसूल तसेच पोलिसांचे पथक
जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिका, पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासनाचे पथक पुन्हा सक्रिय होणार आहे.