ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंधास एक जूनपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:27 AM2021-05-15T04:27:04+5:302021-05-15T04:27:04+5:30

अशी आहे नियमावली इतर राज्यातून कोणत्याही प्रवासी साधनांद्वारे प्रवास करून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना ४८ तास पूर्वीचा निगेटिव्ह ...

Restrictions under Break the Chain extended to June one | ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंधास एक जूनपर्यंत मुदतवाढ

ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंधास एक जूनपर्यंत मुदतवाढ

Next

अशी आहे नियमावली

इतर राज्यातून कोणत्याही प्रवासी साधनांद्वारे प्रवास करून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना ४८ तास पूर्वीचा निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील

महाराष्ट्र शासनाकडील सेन्सेटिव्ह ओरिजिन या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांकरिता असलेली मानक कार्यप्रणाली, देशातील कोणत्याही भागातून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींकरिता लागू राहतील.

मालवाहतूक करणाऱ्या वाहनात केवळ २ व्यक्ती (वाहनचालक व क्लिनर) यांनाच प्रवासास मुभा असेल. जर सदर मालवाहतूक ही राज्याबाहेरून येणार असेल तर त्यातील वाहनचालक व क्लिनर यांनी चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी ४८ तास पूर्वीचा निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक असेल व निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल सात दिवसांकरिता वैध असतील.

दूध संकलन, दुधाची वाहतूक व प्रक्रिया यास परवानगी असेल तथापि त्यांच्या किरकोळ विक्रीस अत्यावश्यक वस्तूंच्या आस्थापनेस व घरपोच वितरणास असलेले निर्बंध लागू राहणार आहे.

बाॅक्स

काटेकोर अंमलबजावणी करा

संबंधित प्रशासकीय विभागप्रमुखांनी आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० व भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम १८८ तसेच साथरोग कायदा १८९७ अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Restrictions under Break the Chain extended to June one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.