महापालिकेद्वारे आयोजित स्पर्धेचे निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:27+5:302021-01-08T05:33:27+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच शहरातील नागरिकांसाठी डिसेंबर महिन्यात विविध ...
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच शहरातील नागरिकांसाठी डिसेंबर महिन्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात ऑनलाईन चित्रकला स्पर्धा, जिंगल्स स्पर्धा, स्ट्रीट, प्ले स्पर्धा, मुव्ही स्पर्धा, म्युरल आर्ट स्पर्धा, इत्यादी विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता.
ऑनलाईन चित्रकला स्पर्धा दोन गटांत घेतली गेली. या चित्रकला स्पर्धेत दोन्ही गट मिळून एकूण ११७ स्पर्धकांनी भाग घेतला. प्रत्येक गटातून दोन उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यात आली. सदर स्पर्धेचे राहुल मुपिडवार आणि आदर्श गजभिये याांनी परीक्षण केले. अ गटातून प्रथम क्रमांक : स्वप्निल कुमार (नारायणा विद्यालयम, चंद्रपूर), द्वितीय क्रमांक १) विहान टिपले (रयतवारी कालरी, मनपा, चंद्रपूर) आणि ब गटातून प्रथम क्रमांक मीनल चिकनकर (एफ.ई.एस. गर्ल्स हायस्कूल, चंद्रपूर), द्वितीय क्रमांक : क्षितीज वनकर (नेहरू कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर) यांनी पटकाविला.
जिंगल स्पर्धात २१ जिंगल्सच्या ऑडिओ क्लिपचे परीक्षण करण्यात आले. त्यातून तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये अमोल प्रभाकरराव बल्लावार, द्वितीय क्रमांक दिनेश वाटकर व तृतीय क्रमांक श्वेता मडावी यांचा समावेश आहे. माहितीपट स्पर्धेत ३१ स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक इरफान शेख, द्वितीय क्रमांक तलाश खोब्रागडे व तृतीय क्रमांक प्रणाली तावाडे यांनी पटकावला.
म्युरल आर्टमध्ये प्रथम क्रमांक संजय वायकोर, द्वितीय हरीश वडगावकर, तसेच तृतीय क्रमांक अजय राजूरकर यांना मिळाला. स्ट्रीट प्लेमध्ये ११ चमूंनी प्रवेश घेतला. विविध प्रभागांत जाऊन स्ट्रीट प्लेचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक जगदीश नंदूरकर आणि चमू, द्वितीय क्रमांक अतुल येरगुडे आणि चमू तसेच तृतीय क्रमांक विघ्नेश्वर देशमुख आणि चमू यांना मिळाला. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत बक्षीस देण्यात येणार आहे.