योग दिनानिमित्त स्पर्धांचे निकाल, विजेत्यांचा झाला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:20 AM2021-06-25T04:20:52+5:302021-06-25T04:20:52+5:30
चंद्रपूर : जागतिक योग दिनानिमित्त चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे निकाल घोषित ...
चंद्रपूर : जागतिक योग दिनानिमित्त चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे निकाल घोषित करण्यात आले असून विजेत्यांना बक्षिसांचे वितरणही करण्यात आले आहे.
एकल योग नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सुरेश अविनाश देवतळे (वरोरा), द्वितीय मनीष कनासकर, तृतीय पौर्णिमा विलास मेश्राम (चंद्रपूर), सामूहिक योग नृत्य स्पर्धेत प्रथम डाॅ. विजय करमरकर व चमू, व्दितीय स्टार ग्रुप तर तृतीय क्रमांक गौरी बाॅडी फिटनेस वरोरा यांनी पटकाविला. सूर्यनमस्कार स्पर्धेत (१२ वर्षांखालील) प्रथम क्रमांक आराध्य विलास बोरसे, व्दितीय भूमी सुमीत सिन्हा, तर १२ वर्षांवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक व्ही. संजय मगनानी, व्दितीय प्राची मुके, तृतीय कविता लुनावत यांना मिळाला.
निबंध स्पर्धेत १० वीपर्यंत प्रथम क्रमांक संचिता भोयेर, व्दितीय जान्हवी सोनवणे, ११ व १२ वी या गटातून प्रथम क्रमांक रिया विनोद बिते, व्दितीय श्रृती घनश्याम झाडे, तृतीय पियूष एस. व्यास, महिला गटातून प्रथम पुरस्कार पौर्णिमा मेश्राम, व्दितीय क्रांती दहीवडे, तृतीय पुरस्कार सुमेध मेश्राम यांनी पटकाविला. उत्तेजनार्थ पुरस्कार व्याहाड खुर्द येथील सरपंच सुनिता उरकुडे व रुही यांना देेण्यात आला.
पुरस्कार वितरण प्रसंगी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डाॅ. गोपाल मुंधडा, विजय चंदावार, श्याम धोपटे, मोहम्मद जिलानी आदींची उपस्थिती होती. प्रकल्प संचालक डाॅ. एस. दास, अश्विनी खोब्रागडे यांनी आयोजनासाठी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी कपीश उसगावकर, दिनेश जुमडे, शिशिर हलदर यांनी परिश्रम घेतले.