सेवानिवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:45 PM2018-03-13T23:45:52+5:302018-03-13T23:45:52+5:30
अंगणवाडी महिलांचे सेवानिवृत्त वय ६५ वरून ६० वर्षे केल्याने १ एप्रिलला १५ हजांराहून जास्त अंगणवाडी महिला निवृत्त होणार आहेत. हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केली.
आॅनलाईन लोकमत
मूल : अंगणवाडी महिलांचे सेवानिवृत्त वय ६५ वरून ६० वर्षे केल्याने १ एप्रिलला १५ हजांराहून जास्त अंगणवाडी महिला निवृत्त होणार आहेत. हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केली.
अंगणवाडी महिला मेळाव्यात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी वैशाली बोकारे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमिला गोडे उपस्थित होत्या. गोडे म्हणाल्या, नियुक्तीच्या आदेशात निवृत्तीचे वय ६५ राहिल, असे स्पष्टपणे लिहिल आहे. मात्र, वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे करणे ही शासनाची धोकेबाजी आहे. हे कदापि खपवून घेणार नाही. प्रा. दहीवडे म्हणाले, २६ जून १९७५ ला रात्री १२ वाजता आणीबाणी घोषित केली. त्यावेळी जे पांघरुन घेऊन झोपले होते त्यांना घरुन उचलून आणण्यात आले. अशा लोकांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा. हा खºया स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. अंगणवाडी महिलांच्या वेतनाकरिता पैसे नाही, असे कारण पुढे केले जाते़ १६ मार्चला जिल्हा परिषद समोर दुपारी १२ वाजता अंगणवाडी महिला धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली़ कार्यक्रमाप्रसंगी छबु बनकर, वर्षा पाल, विजया महावादीवार, सिंधू कावळे, माया कोहपरे यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.