गावखेड्यांत संविधानाची माहिती पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:22 PM2018-07-13T23:22:11+5:302018-07-13T23:22:28+5:30
भारतीय संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला. सामाजिक कर्तव्याची जाणिव आणि राष्ट्रपे्रमाची शिकवण दिली. अन्यायाविरूद्ध आवाज उठविण्याचे बळ दिले. त्यामुळे संविधानातील मूलभूत विचार गावखेड्यांत पोहोचवा, असे मत निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला. सामाजिक कर्तव्याची जाणिव आणि राष्ट्रपे्रमाची शिकवण दिली. अन्यायाविरूद्ध आवाज उठविण्याचे बळ दिले. त्यामुळे संविधानातील मूलभूत विचार गावखेड्यांत पोहोचवा, असे मत निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, महाराष्ट्र आॅफिसर्स फोरम नवयुवक सिद्धार्थ बौद्ध मंडळ व फुले आंबेडकरी विचारधारा समितीच्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ देवगडे तर प्रमुख अतिथी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. किशोर मानकर खुशाल तेलंग, प्रकाश टाकला. यावेळी हिराचंद बोरकुटे, गणपत उपरे, देशक खोब्रागडे उपस्थित होते. खोब्रागडे म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी शोषित, पीडित व वंचित लोकांकरिता संविधानात करून अनेक तरतुदी केल्या. त्यामुळे मूलभूत अधिकारांची जाणीव करून देण्याकरिता संविधानाचा जागर ग्रामीण भागात केला पाहिजे. देवगडे म्हणाले, चंद्रपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन, संविधान दिन, डॉ. आंबेडकर सभागृहाची सुत्रे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात आली. हे कर्तव्य मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. ही समिती जागर संविधानाचा हा उपक्रम राबविण्यास कटीबद्ध आहे. एवढ्यावरच न थांबता स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिकाही सुरू करणार आहे. डॉ. मानकर यांनीही सामाजिक चळवळ आणि बांधिलकी या विषयावर विचार मांडले. देवगडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकाम पूर्णत्वास नेवून या शहराचा लौकीक वाढविण्याचे कार्य केले, असेही म्हणाले. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक हुशार विद्यार्थी आहेत. मात्र, त्यांना ग्रंथालय उपलब्ध होत नसल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करता येत नाही. पालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज मान्यवरांनी व्यक्त केली.
यावेळी फुले, आंबेडकर विचार संवर्धन समिती, नवयुवक सिद्धार्थ मंडळ, आॅफिसर्स फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदीप अडकिने, संचालन बंडू फुलझेले, डॅनियल देवगडे यांनी केले. ई. एस. मेश्राम यांनी मानले.