रेती तस्करांवर महसूल विभागाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:21 AM2021-05-28T04:21:38+5:302021-05-28T04:21:38+5:30

तीन बारमाही नद्यांचा समावेश असलेल्या गोंडपिपरी तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील नदीपात्र तसेच अन्य नाल्यात मुबलक प्रमाणात गौण खनिज उपलब्ध आहेत. ...

Revenue department keeps a close eye on sand smugglers | रेती तस्करांवर महसूल विभागाची करडी नजर

रेती तस्करांवर महसूल विभागाची करडी नजर

Next

तीन बारमाही नद्यांचा समावेश असलेल्या गोंडपिपरी तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील नदीपात्र तसेच अन्य नाल्यात मुबलक प्रमाणात गौण खनिज उपलब्ध आहेत. याचा लाभ घेत तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून महसूल विभागातील रिक्त पदे व कोरोना पार्श्वभूमीवर टाळेबंदी काळात महसूल अधिकाऱ्यांची व्यस्ततेचा गैरफायदा घेत तालुक्यातील अवैध उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांनी रात्रपाळी गौण खनिज उत्खननाचा सपाटा सुरू केला होता. विशेष भरारी पथक अस्तित्वात असतानाही मध्यरात्री चालणारा या गोरखधंद्याला पूर्णत: विराम देण्यात अपेक्षित यश मिळत नसल्याने उपविभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे यांच्या विशेष मार्गदर्शनात गोंडपिपरी तहसीलदार के. डी. मेश्राम यांनी आता नव्याने शक्कल लढवून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पथक तहसीलदार यांचे अधीनस्त मंडळ अधिकारी धुर्वे यांच्या निगराणीत तलाठी, पोलीस पाटील पोलीस कर्मचारी यांची बदलते क्रमवारीने कर्तव्य व कामकाज आखून दिलेले असून सदर पथकाची कामकाजाची वेळ रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत शहरातील मुख्य टी पॉइंट शिवाजी चौक येथे गस्तीवर राहणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे.

Web Title: Revenue department keeps a close eye on sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.