महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:50 PM2018-08-17T22:50:15+5:302018-08-17T22:50:33+5:30

प्रशासनात महसूल विभाग महत्त्वाचा कणा आहे. या प्रशासनातील कामकाजामुळे शासनाची प्रतिमा उज्वल होते. विकासाचा तो प्रमुख घटक आहे.

Revenue department officials felicitate | महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार

महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार

Next
ठळक मुद्देपालकमंत्री : सेवावृत्ती जोपासून जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : प्रशासनात महसूल विभाग महत्त्वाचा कणा आहे. या प्रशासनातील कामकाजामुळे शासनाची प्रतिमा उज्वल होते. विकासाचा तो प्रमुख घटक आहे. सेवा गुण बाळगल्याने सर्वसामान्य जनतेला न्याय देता येतो, असा कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव होणे क्रमप्राप्त आहे. त्यांनी सेवावृत्ती जोपासून प्रशासनात जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाºयांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. महसूल विभागाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान कार्यक्रम पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रशासनात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल मूल येथील तहसीलदार राजेश सरवदे, बल्लारपूरचे नायब तहसीलदार रमेश कुळसंगे, उपविभागीय कार्यालय चंद्रपूरचे अव्वल कारकून राजेश लक्कावार, वरोरा येथील लिपीक नितीन मडावी, भद्रावतीचे मंडळ अधिकारी गुणवंत वाभीटकर, गोंडपिपरीचे तलाठी जयवंत मोरे, जोगापूरचे पोलीस पाटील राजू मोरे, ब्रह्मपुरीचे कोतवाल अमोल तोडासे यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Revenue department officials felicitate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.