अर्धवट घरकूल व गुरांच्या गोठ्यावरून उलट तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:34 AM2021-09-04T04:34:00+5:302021-09-04T04:34:00+5:30
शुक्रवारी आठ तालुक्यातील गावांना भेटी देऊन रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी केली. गुरूवारी समितीच्या चार पथकाने पाच तालुक्यातील २१ ...
शुक्रवारी आठ तालुक्यातील गावांना भेटी देऊन रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी केली. गुरूवारी समितीच्या चार पथकाने पाच तालुक्यातील २१ गावांना भेटी दिल्या होत्या.
शुक्रवारी चिमूर तालुक्यातील मासळ (बु), मदनापूर, कोलारा, सिंदेवाही तालुक्यातील शिवणी, गडबोरी, रामाळा, नागभीड तालुक्यातील गिरगाव, मिंडाळा, ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळगाव, गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगाव (गणपूर), चेक व्यंकटपूर, वढोली, गणेशपिंपरी, पोंभूर्णा तालुक्यातील आष्टा, बोर्डा बोरकर तसेच सावली व मूल तालुक्यातील गावांना ही भेटी दिल्या. समितीच्या सदस्यांनी रोपवाटिका,फळबाग लागवड, गुरांचा गोठा, वृक्ष लागवड, बोडी खोलीकरण, अभिसरण, शोषखड्डे, गट लागवड, घरकूल, रस्ता दुतर्फा, स्मशानभूमी शेड बांधकाम आदी कामांची पाहणी केली. समितीमध्ये समितीप्रमुख आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्यासह आमदार राजेश पाटील, आमदार नरेंद्र दराडे, आमदार अमोल मिटकरी, आमदार दादाराव केचे, आमदार रामदास आंबटकर, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार शिरीष चौधरी, आमदार समीर कुणावार, आमदार दिलीप बोरसे, आमदार राजेश राठोड आदींचा समावेश आहे.