चंद्रपूरच्या दारूबंदीबाबत समीक्षा समिती गठित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 01:07 PM2020-01-17T13:07:06+5:302020-01-17T13:07:51+5:30
दारूबंदीमुळे चार वर्षांच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात काय फायदे वा तोटे झाले, याची समीक्षा होणे गरजेचे आहे. यासाठी सरकार समीक्षा समिती गठित करेल अशी माहितीही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दारूबंदी लागू झालेली आहे. या दारूबंदीमुळे या चार वर्षांच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात काय फायदे वा तोटे झाले, याची समीक्षा होणे गरजेचे आहे. यासाठी सरकार समीक्षा समिती गठित करतील. या समितीत जिल्ह्यातील आमदारांसह तज्ज्ञ मंडळींचा समावेश असेल. ही समिती दारूबंदी झाल्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात एकंदर स्थितीचा सर्वकष अभ्यास करतील. यामध्ये दारूबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात काय दुष्परिणाम बघायला मिळाले वा यामुळे सामाजिक स्वास्थ्य सुधारले. याबाबींची चोहोबाजुने अभ्यास करून ही समिती आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर करतील. या आधारावरच राज्य सरकार चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी कायम ठेवायची वा नाही याचा निर्णय करतील, अशी माहितीही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.