इको-प्रोच्या किल्ला स्वच्छतेचा पालकमंत्र्यांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:18 PM2018-02-12T23:18:49+5:302018-02-12T23:19:12+5:30
इको-प्रोच्या वतीने मागील ३३२ दिवसांपासून चंद्रपुरातील प्राचीन किल्ला व अवशेषांची स्वच्छता केली जात आहे. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी इको-प्रोच्या या अभियानाला रविवारी भेट देऊन आढावा घेतला.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : इको-प्रोच्या वतीने मागील ३३२ दिवसांपासून चंद्रपुरातील प्राचीन किल्ला व अवशेषांची स्वच्छता केली जात आहे. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी इको-प्रोच्या या अभियानाला रविवारी भेट देऊन आढावा घेतला.
शहरातील ऐतिहासीक गोंडकालीन किल्ल्याची स्वच्छता अभियान १ मार्च २०१७ पासुन सुरू करण्यात आले असून रोज नियमित संस्थेच्या स्वंयसेवकांच्या मदतीने श्रमदानाच्या माध्यमातून किल्ले व परकोट स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.
बगड खिडकी परिसरातील सर्वाधिक सुंदर असलेल्या बुरूज क्रमांक ४ मध्ये स्वच्छता सुरू असताना ना. सुधीर मुनगंटीवार तेथे आले. अभियानाची पाहणी केली. यादरम्यान गोंडराजांनी बांधलेला भक्कम आणि मजबुत किल्ला कसा दुरावस्थेत होता. आता स्वच्छतेनंतर यात कसा फरक पडला आहे, किल्ला स्वच्छता अभियान राबविण्यापूर्वी आणि नंतरची स्थिती दर्शविणारे छायाचित्र दाखवित किल्ला अभियानाची पालकमंत्र्यांना माहिती देण्यात आली. रामाळा तलाव पर्यटन विकास करताना किल्ल्यास लागून बांधण्यात आलेला रामाळा तलाव ते बगड खिडकी हा रस्ता वापरात नसल्याने मोठया प्रमाणात झुडपे वाढल्याने बंद झाला आहे. त्याची साफसफाई सुरू असून या रस्ताची पूर्वीप्रमाणे बांधकाम करण्याची गरज, शहरातील ऐतिहासीक पर्यटन विकासाच्या दृष्टीने हेरीटेज वॉक आयोजित करण्याची, किल्ल्यास लागून होत असलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम, आतील भागाचा वापर ‘पाथ वे’ व 'सायकल ट्रेक' म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा, अशी मागणी इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी पालकमंत्र्यांकडे केली.