पक्षांतर्गत निवडणूक तयारीचा आढावा
By admin | Published: April 6, 2017 12:37 AM2017-04-06T00:37:13+5:302017-04-06T00:37:13+5:30
चंद्रपूर महानगरपालिकेच्या १९ एप्रिलला होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे घोषित अधिकृत उमेदवारांच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी....
हंसराज अहिर यांची आढावा बैठक : चार प्रभागातील उमेदवारांची भेट
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या १९ एप्रिलला होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे घोषित अधिकृत उमेदवारांच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मंगळवारला चार प्रभागातील १६ उमेदवारांच्या व त्या-त्या परिसरातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत भेट घेवून निवडणूक संदर्भात मौलिक सूचना व मार्गदर्शन केले. उमेदवारांशी निवडणुकीसंदर्भात विस्तृत चर्चाही केली.
यावेळी शास्त्रीनगर प्रभाग क्र. २ , एमईएल प्रभाग ३, बंगाली कॅम्प प्रभाग ४, भानापेठ प्रभाग क्र. ११ येथील उमेदवारांशी निवडणूक संदर्भात चर्चा करताना प्रचारादऱ्यान उद्भवणाऱ्या अडचणी व त्या दृष्टीने उपाययोजना संदर्भात ना. हंसराज अहीर यांनी या सर्व उमेदवारांशी चर्चा केली. पक्षाच्या प्रभागातील सर्व उमेदवारांनी एकत्रितपणे प्रचाराची धुरा सांभाळतांना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवत त्यांच्या सहकार्यातून या निवडणुकीमध्य विजय संपादन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा.
अल्पावधीत मतदारापर्यंत पोहचून सरकारच्या विविधांगी योजनांच्या माध्मातून महानगरात झालेला विकास तसेच भाजप सत्ताकाळातील विकासाचा गोषवारा मतदारापर्यंत प्रभावपणे पोहचविण्याच्या सुचना त्यांनी या भेटी दरम्यान दिल्या. विविध विषयांवर उमेदवारांशी चर्चा करून कार्यकर्त्यांना चंद्रपूर महानगर पालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
त्यांच्या या भेटीदरम्यान भाजपा नेते विजय राऊत, बंशीधर तिवारी, राजेंद्र तिवारी, प्रमोद शास्त्रकार, रमेश भुते, सुभाष कासनगोट्टूवार, पुनमचंद तिवारी, शंकर मोरे, सागर येडणे, शशीधर तिवारी, महादे पोटे, यांच्यास अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.