आमदारांकडून पाणीपुरवठा योजनेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:26 AM2021-05-22T04:26:20+5:302021-05-22T04:26:20+5:30
नागभीड : नागभीड नगर परिषदेच्या ३८ कोटी रुपये किमतीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेच्या कामाचा आढावा ...
नागभीड : नागभीड नगर परिषदेच्या ३८ कोटी रुपये किमतीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेच्या कामाचा आढावा आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी गुरुवारी घेतला.
नागभीड नगर परिषद व समाविष्ट गावांची पाण्याची गरज लक्षात घेऊन नागभीड नगर परिषदेने ३८ कोटी रुपये किमतीची पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केली होती. आमदार भांगडिया यांच्या प्रयत्नाने या योजनेस मंजुरी मिळाली. या योजनेचे काम आता सुरू आहे. या योजनेचे जलकुंभ आणि पाइपलानचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आले असून, घोडाझरी तलावात या पाणीपुरवठा योजनेची मुख्य विहीर खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही विहीर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमदार भांगडिया यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. हा आढावा घेत असताना बांधकाम लवकर पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेस दिल्या. यावेळी वसंत वारजुकर, नगराध्यक्ष प्रा. उमाजी हिरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष रडके, न. प.चे बांधकाम सभापती सचिन आकुलवार, नगरसेवक शिरीष वानखेडे, गौतम राऊत, रूपेश गायकवाड, दशरथ उके, प्रगती धकाते, दुर्गा चिलबुले, काजल कोसे, गुलझार धम्मानी, हनिफभाई जादा, विजय काबरा, ईश्वर मेश्राम यांची उपस्थिती होती.