ताडोबातील वाघांच्या जीवनशैलीवर होणार संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:39 PM2019-07-01T12:39:09+5:302019-07-01T12:41:16+5:30

मानव-वन्यजीव संघर्ष, कमी होणारे जंगल, जंगलातील मानवी हस्तक्षेप आणि वाढणारे वाघ या सर्व प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी वाघांच्या जीवनशैलीचा अभ्यास देहरादून वाईल्ड लाईफ इस्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतर्फे करण्यात येत आहे.

The revision will be done on the tiger lifestyle of Tadoba | ताडोबातील वाघांच्या जीवनशैलीवर होणार संशोधन

ताडोबातील वाघांच्या जीवनशैलीवर होणार संशोधन

Next
ठळक मुद्देवाईल्डलाईफ इस्टिट्युट संस्था विदर्भातील सात अभायारण्याचा करणार अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्ष, कमी होणारे जंगल, जंगलातील मानवी हस्तक्षेप आणि वाढणारे वाघ या सर्व प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी ताडोबातील व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या जीवनशैलीचा अभ्यास देहरादून वाईल्ड लाईफ इस्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतर्फे करण्यात येत आहे.
विदर्भातील ताडोबा, मेळघाट, बोर, नवेगाव, पेंच, नागझिरा आणि उमरेड-करांडला या व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या जीवनशैलीचा अभ्यास करुन संशोधन करण्यात येत आहे. चंद्रपुरात ताडोबा येथील अभायारण्य देशातच नाहीतर जगात प्रसिद्ध आहे. हमखास व्याघ्रदर्शन अशी प्रचिती ताडोबा अभायारण्यात आहे. या प्रकल्पात वाघांचा प्रजनन दर अधिक आहे. ताडोबाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात ८५ वाघ आणि बछडे वास्तव्यास आहेत.
वाघ सात-आठ वर्षाचा झाला की तो आपला स्वतंत्र अधिवास तयार करतो. हा अधिवास तयार करताना तिथे आधीपासून असलेल्या वयोवृध्द वाघाला हाकलून लावतो. हा प्रकार अलिकडच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढला. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. एका क्षेत्रात दोन वाघ राहू शकत नाही. मात्र सततच्या जंगलतोडीमुळे वाघाच्या तुलनेत जंगलाचे प्रमाण कमी पडत आहे. त्यामुळे एकाला बाहेर पडावे लागते. अशा स्थितीत तो जंगलाशेजारी असलेल्या गावाजवळ आश्रय घेतो. वृध्दत्वामुळे शिकार करणे अवघड होत असल्याने तो गावातील गुरांची शिकार, जंगलात जाणाऱ्या माणसांवर हल्ले करतो. जंगलाबाहेर पडणाऱ्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष चंद्रपूर जिल्ह्यात मोठा प्रमाणात आहे. तेंदू पाने, बांबू, जळाऊ लाकडे आणण्यासाठी जंगलात घुसखोरी करणाऱ्या माणसांवर हल्ले होतात. या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यासाठी वाघांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात येत असून देहरादून येथील वाईल्डलाईफ इस्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेसोबत या संदर्भात वनविभागाचा करार झाला आहे. वाघांच्या अभ्यासाचा अहवाल येत्या काही महिन्यातच सर्व व्याघ्र प्रकल्पांना सोपविला जाणार आहे. त्यामुळे वाघांचे संगोपन, त्यांची हाताळणी सुरक्षा यांचे नियोजन शक्य होणार आहे.

Web Title: The revision will be done on the tiger lifestyle of Tadoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ