‘लोकमत’च्या खुली चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण

By admin | Published: June 18, 2016 12:39 AM2016-06-18T00:39:18+5:302016-06-18T00:39:18+5:30

लोकमत व सनलिट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जूनला चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

Reward distribution of Lokmat's open painting competition | ‘लोकमत’च्या खुली चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण

‘लोकमत’च्या खुली चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण

Next

चंद्रपूर : लोकमत व सनलिट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जूनला चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा स्थानिक शांताराम पोटदुखे हॉल सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे गुरूवारी सायंकाळी ४ वाजता पार पडला.
ही स्पर्धा वर्ष ९ ते १८ अ गट व वर्ष १९ ते पुढे ब गट अशा दोन वयोगटात घेण्यात आली होती. अ गटात प्रथम क्रमांक जय डी. कुंभारे, द्वितीय वेदांत आर. वनसिंग, तृतीय श्रद्धा जयंत वनकर व प्रोत्साहनपर बक्षीस आकाश मनोज मडावी, आदिती झाडे, आर्थिक संजय उपाध्ये यांनी पटकाविला. ब गटात प्रथम क्रमांक नयन बाबुराव ताजने, द्वितीय सुरज वसंत बिटे, तृतीय अनिल लक्ष्मण मोरे व प्रोत्साहनपर बक्षीस सिम्मी अरुण बरडे, योगिता उमाकांत धांडे, संजय रामचंद्र उपाध्ये यांनी पटकाविला. सर्व विजयी स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरदार पटेल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राजेश इंगोले, स्वामी कृपा बहुउद्देशिय संस्थेचे सचिव मनोज पुलगमकर, प्रसिद्ध चित्रकार सुदर्शन बारापात्रे, प्रसिद्ध ज्योतिषाचार्य अरविंद पांडे आणि प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक संजय पेंडसे, लोकमत जिल्हा कार्यालय चंद्रपूरचे सहा. शाखा व्यवस्थापक विनोद बुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले. कार्यक्रमाचे संचालन नागपूर सखी मंच संयोजिका नेहा जोशी यांनी केले.
यशस्वीतेसाठी लोकमत सखी मंच संयोजिका पूजा ठाकरे व बालविकास मंच जिल्हा संयोजक सुरज गुरनुले यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Reward distribution of Lokmat's open painting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.