ऐका हो ऐका... एक रुपया किलोचा तांदूळ महाराष्ट्रात चाळीस रुपये किलो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 10:18 AM2022-01-30T10:18:56+5:302022-01-30T10:24:00+5:30

तेलंगणामधील एक रुपया किलोचा तांदूळ महाराष्ट्रात तब्बल चाळीस रुपये किलोने विक्री होत असल्याची धक्कादायक वास्तव पुढे आले.

rice smuggling from telangana to maharshtra | ऐका हो ऐका... एक रुपया किलोचा तांदूळ महाराष्ट्रात चाळीस रुपये किलो?

ऐका हो ऐका... एक रुपया किलोचा तांदूळ महाराष्ट्रात चाळीस रुपये किलो?

googlenewsNext
ठळक मुद्देतांदूळ तस्करी : तेलंगणाच्या तांदळाला लागतात महाराष्ट्रातील लेबल

बी. यू. बोर्डेवार

राजुरा (चंद्रपूर) : लगतच्या तेलंगणा राज्यातील कागजनगर व माकोडी येथील शेतकरी आपला तांदूळ रेल्वेने आणून विरुर (स्टे) येथील बाजारात विकत आहे. तर काही शेतकरी आपल्या नातेवाईकांना देत असल्याची माहिती विरुर पोलीस स्टेशन यांच्याकडून मिळाली. मात्र, दररोज विरुर रेल्वे स्टेशनवर उतरणारा तांदूळ कोणत्या नातेवाईकांकडे जातो. विरुर (स्टे.) ही बाजारपेठ एवढी मोठी आहे की, या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात तांदूळ उतरवून विकल्या जात आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. अधिक माहिती घेतली असता तेलंगणामधील एक रुपया किलोचा तांदूळ महाराष्ट्रात तब्बल चाळीस रुपये किलोने विक्री होत असल्याची धक्कादायक वास्तव पुढे आले.

विरुर (स्टे.) पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात तांदूळ तस्करीचे रॅकेट सक्रिय असून यापूर्वीही या ठिकाणी होणाऱ्या तांदूळ तस्करीच्या तक्रारी झाल्या आहे. दोन वर्षांपूर्वी येथील तांदूळ साठवून ठेवणाऱ्या दोन ते तीन गोदामावर कारवाई झालेली आहे. हे सर्वश्रुत असून स्थानिक पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत तांदळाची तस्करी करीत आहे. मात्र पोलीस प्रशासन शेतकऱ्याचा तांदूळ म्हणत मौन धारण करून असल्याचे दिसून येत आहे.

तांदूळ तेलंगणाचा लेबल महाराष्ट्राचे

विरुर (स्टे) येथून तांदूळ ब्रह्मपुरी, गोंदियाला पाठवून त्याठिकाणी मिलमध्ये पिसाई केली जाते. नंतर लेबल बदलवून खुल्या बाजारात जादा दराने विक्रीला आणला जात आहे. यात सर्व सामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. यावर आळा घालण्यासाठी अन्न पुरवठा विभाग व पोलीस प्रशासनाने लक्ष घालून कारवाही गरजेची आहे.

विरुर (स्टे.) परिसरात सुरू असलेल्या तांदूळ तस्करीसंबंधी संबंधित पोलीस व अन्न प्रशासन विभागाने याकडे लक्ष टाकून योग्य ती कार्यवाही करावी. करावी अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार केल्या जातील

- ॲड. वामनराव चटप, माजी आमदार राजुरा

यापूर्वी या परिसरात सुरू असलेल्या तांदूळ तस्करीसंबंधी यापूर्वीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे कार्यवाही करण्याची मागणी केली होती. तेव्हाच कार्यवाही झाली असती तर आता ही वेळ आली नसती. होत असलेल्या तांदूळ तस्करीवर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल.

- ॲड. संजय धोटे, माजी आमदार, राजुरा.

Web Title: rice smuggling from telangana to maharshtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.