तांदळाची तस्करी करणारे वाहन उलटले; चंद्रपूर जिल्ह्यात एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:42 AM2019-09-16T11:42:43+5:302019-09-16T11:43:04+5:30
तेलंगणातून रेल्वेने तांदळाची तस्करी करून ती पिकअप व्हॅनने आणताना, ही गाडी उलटून झालेल्या अपघातात एक नागरिक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. १६) रोजी सकाळी मूर्ती गावाजवळ घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: तेलंगणातून रेल्वेने तांदळाची तस्करी करून ती पिकअप व्हॅनने आणताना, ही गाडी उलटून झालेल्या अपघातात एक नागरिक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. १६) रोजी सकाळी मूर्ती गावाजवळ घडली.
या गावातील गोसावी कान्हू पिपरे हे गृहस्थ सकाळी गावाबाहेर पायी गेले असताना एका नाल्याजवळ हे वाहन उलटले व त्याखाली दबून पिपरे यांचा मृत्यू झाला.
तेलंगणातून मोठ्या प्रमाणात तांदळाची तस्करी केली जाते. राजुरा तालुक्यातील विरुर येथे आणून हा तांदूळ विकला जातो. काही महिन्यापूर्वी विरूर येथील तांदळाच्या व्यापाऱ्याच्या गोदामावर धाड टाकून मोठा साठा जप्त करण्यात आला होता.
सोमवारी प्रदीप पांजा यांच्या मालकीचे पिकअप वाहन विहिरगाव रेल्वे स्थानकावरून तांदूळ घेऊन मूर्ती मार्गे विरुरला जात असताना नाल्याच्या काठावर वळण घेताना हे वाहन अनियंत्रित होऊन उलटले झाले. यात पिपरे दबून ठार झाले. मृताच्या वारसदारांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.