हिंदू कोड बिलामुळेच मिळाले अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:39 PM2019-03-19T22:39:13+5:302019-03-19T22:39:38+5:30

आता महिला शिक्षित झाल्या. प्रत्येक जातीधर्मात समाविष्ट होऊन कार्य करू लागल्या. मात्र आजही अनेक महिलांना सावित्री कळली नाही. आपण फक्त गाडी, घोडा व माडी यामध्येच गुंतलो आहो. महिलांनी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून परिवर्तनवादी विचार अंगिकारले पाहिजे.

Right from the Hindu code bills | हिंदू कोड बिलामुळेच मिळाले अधिकार

हिंदू कोड बिलामुळेच मिळाले अधिकार

Next
ठळक मुद्देप्रज्ञा राजूरवाडे : महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक समितीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : आता महिला शिक्षित झाल्या. प्रत्येक जातीधर्मात समाविष्ट होऊन कार्य करू लागल्या. मात्र आजही अनेक महिलांना सावित्री कळली नाही. आपण फक्त गाडी, घोडा व माडी यामध्येच गुंतलो आहो. महिलांनी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून परिवर्तनवादी विचार अंगिकारले पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणले नसते, तर सावित्रींच्या लेकींची काय अवस्था असती? हिंदु कोड बिलामुळेच आपले अधिकार व हक्क मिळाले, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समता दूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक समिती महिला मंच शाखा चिमूरच्या वतीने गुरुदेव सेवा मंडळ जुनी राष्ट्रीय शाळा येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन, पुरोगामी शिक्षक समिती राज्याध्यक्ष अल्का ठाकरे, मार्गदर्शक राज्य सल्लागार चंदा खांडरे, जिल्हाध्यक्ष सुनिता इटनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभावती येकुर्के, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. लाखे, पुष्पा राऊत आदी उपस्थीत होत्या.
याप्रसंगी अल्का ठाकरे म्हणाल्या, स्त्री राष्ट्रनिर्माती आहे. स्त्रीमुळेच मुक्ताईचा ज्ञानेश्वर, जिजाऊचा शिवबा कसा झाला हे प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगीरी केल्यामुळे माधूरी काळे, प्रणीती पुसटकर या शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान भुमिका देहारे व आदीशक्ती महिला मंडळने माँ तुझे सलाम, या गान्यावर नृत्य सादर केले. चंदा गुडवार, शारदा गेडाम, निता वनकर यांनी कविता गायन, वर्षा निमजे यांनी वृध्दाश्रमातील आई - वडीलावर एकपात्री नाट्य सादर केले. संचालन वंदना हटवार, आभार वैशाली शेंबेकर यांनी मानले.कार्यक्रमाला कल्पना महाकरकार, गिता ठाकरे, मंजुषा मेंढुलकर, अरुणा चिचपाले, चंदा गुडवार, वैशाली डाहुले, नलु गुडधे आदी शिक्षिकांनी विशेष सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्यने महिलांची उपस्थिती होती.

Web Title: Right from the Hindu code bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.