८० वर्षांवरील ४९ हजारांवर मतदार बजावणार मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:20 PM2019-03-26T22:20:47+5:302019-03-26T22:21:31+5:30
लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असून सर्वच मतदारांमध्ये उत्साह शिगेला पोहचला आहे. असे असले तरी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ४९ हजार ४५७ उमेदवार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. विशेष म्हणजे, सर्वांत जास्त वयोवृद्ध मतदारांची संख्या आर्णी विधानसभा क्षेत्रात असून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी वयोवृद्ध मतदारांची संख्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असून सर्वच मतदारांमध्ये उत्साह शिगेला पोहचला आहे. असे असले तरी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ४९ हजार ४५७ उमेदवार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. विशेष म्हणजे, सर्वांत जास्त वयोवृद्ध मतदारांची संख्या आर्णी विधानसभा क्षेत्रात असून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी वयोवृद्ध मतदारांची संख्या आहे.
लोकसभेसाठी ११ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. प्रशासनाने तयारी केली असून इव्हीएमची बटन दाबून मतदान करता येणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात सहा विधानसभा क्षेत्र आहे. यामध्ये राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी, आर्णी विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.
निवडणूक म्हटली की, शहरापासून तर ग्रामीण भागात चर्चेचा विषय असतो. जो-तो आपआपल्या पार्टीचा प्रचार करतो. सध्या कार्यकर्ते प्रचारात गुंतलेले असून मतदानाची गावनिहाय गोळाबेरीच करण्यामध्ये व्यस्त आहे. यामध्ये समाज, धर्मनिहायही बेरीज केल्या जात आहेत.यामध्ये कोणता उमेदवार बाजी मारेल हे २३ मे नंतरच सांगता येणार आहे. यावर्षी १८ ते १९ वयोगटातील २२ हजार ९६५ मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर ४९ हजार ४५७ मतदार हे ८० वर्षांपेक्षा जास्त वर्षांचे असून ते त्याच उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या ६ हजार ८९६ असून ही चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील सर्वात कमी संख्या आहे. तर सर्वात जास्त वयोवृद्ध मतदारांची संख्या आर्णी मतदार संघात असून ती १० हजार १४५ इतकी आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या ७ हजार २७ आहे. चंद्रपूरमध्ये ८ हजार ६४८, वरोरा ८ हजार ३७४, वणी- ८ हजार ३६७ वयोवृद्ध मतदारांची संख्या आहेत.