माणूस उठला पर्यावरणाच्या जीवावर !

By admin | Published: June 5, 2016 12:39 AM2016-06-05T00:39:55+5:302016-06-05T00:39:55+5:30

पर्यावरणाशी माणसाचा अगदी जवळचा संबंध आहे. पर्यावरणाशिवाय माणूस ही संकल्पनाच करणे अवघड आहे.

Rise of the living environment! | माणूस उठला पर्यावरणाच्या जीवावर !

माणूस उठला पर्यावरणाच्या जीवावर !

Next

जंगलतोडीने बिघडला पर्यावरणाचा समतोल : पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज
प्रकाश काळे गोवरी
पर्यावरणाशी माणसाचा अगदी जवळचा संबंध आहे. पर्यावरणाशिवाय माणूस ही संकल्पनाच करणे अवघड आहे. दिवसागणिक चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढणारे उद्योगधंदे, कारखाने हे जरी जिल्हावासीयांसाठी फायद्याचे ठरत असले तरी कारखान्यातून सोडण्यात येणारे विषारी वायू हे पर्यावरणासाठी घातक आहे. एकीकडे माणसाने पर्यावरणावरच घाव घातला तर दुसरीकडे पर्यावरण दूषित झाल्याने माणसाचा श्वास कोंडला जातो. चंद्रपूर जिल्ह्याचे प्रदूषण देशपातळीवर चर्चिले जात असतानाही आजवर यावर संबंधित विभागाने नियंत्रण मिळविलेले नाही.
पर्यावरण हा तर सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. माणसाच्या जन्मापासून तर त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत माणूस पर्यावरणाच्या छायेत आयुष्य जगत असतो. निसर्गाचा समतोल आज बिघडला आहे. माणसाने स्वत:च्या फायद्यासाठी जंगलावरच कुऱ्हाड चालविली. त्यामुळे वनसंपदा नष्ट झाली. आज जिल्ह्यात उद्योगधंद्याची भरमार आहे. माणसाच्या प्रगतीत उद्योगधंद्याचे योगदान महत्त्वाचे आहे, हे खरे. मात्र कारखान्यांकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याने पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. कोणताही कारखाना सुरू करताना पर्यावरणाला धोका होऊ नये यासाठी शासनाने काही निर्बंध घालून दिले आहे. त्याचे तंतोतंत पालन करून पर्यावरणाला बाधा पोहचू नये यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु शासनाने कारखाण्यांना घालून दिलेले नियम कारखानदारांनी धाब्यावर बसविले आहे. त्यामुळे कारखाने मोठ्या प्रमाणात धूर ओकायला लागले आहे. धूळ प्रदूषण वाढल्याने माणसाचा श्वास दिवसेंदिवस गुदमरत चालला आहे. यासाठी काही सामाजिक संघटना पर्यावरण वाचवा संदेश देत पुढे आल्या आहे.
पर्यावरणाच्या ऱ्हासाला खरे तर माणूसच जबाबदार आहे. माणसाने पर्यावरणाचा समतोल बिघडविल्याने निसर्ग आता लहरीपणाने वागायला लागला आहे. पर्यावरण संवर्धन करणे आज काळाची गरज असताना माणूस असा बेफीकीरीने वागायला लागला आहे की त्याने पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यात सिमेंट उद्योग, पेपरमील, वीज केंद्र, वेकोलिच्या खाणी, स्टिल प्लँट यासारखे अनेक उद्योग आहेत. उद्योगांनी नदी, नाल्याचे अस्तीत्वच धोक्यात आणले आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊ लागला आहे. माणसाने पर्यावरणावरच घाव घातल्याने माणसावर त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे. हा सारा निसर्गाचा कोप नव्हे, पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याने पर्यावरणात बदल होऊन उद्भवलेली कृत्रीम परिस्थिती आहे. पर्यावरणाचा असाच ऱ्हास होत राहिला तर एक दिवस माणसाचे अस्तित्वच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. हा भविष्याचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी पर्यावरण वाचवा चा संदेश देऊन पर्यावरणाचे संवर्धन करणे आज काळाची गरज झाले आहे.

शतकोटी वृक्ष लागवडीचा फज्जा

झाडांची संख्या कमी झाल्याने त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला आहे. हा एकच धागा पकडून शासनाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना शतकोटी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे आदेश दिले. यावर शासनाने लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र शासनाच्या काही बेजबाबदार अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करीत प्रत्यक्षात वृक्ष लागवड न करता कागदावरच वृक्ष फुलविले. यात शासनाचा शतकोटी वृक्ष लागवडीचा फज्जा उडविण्यात आला.

पर्यावरण वाचवासाठी सामाजिक संघटना सरसावल्या

पर्यावरण वाचविणे आज काळाची गरज आहे. यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला असून त्या नेटाने काम करीत आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी चाललेली त्यांची धडपड वाखाणण्यासारखी आहे. पर्यावरणाला वाचविणे हे सर्वाचे परमकर्तव्य आहे.

Web Title: Rise of the living environment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.