निर्जीव लाकडात जीव फुंकतो ‘ऋषी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:39 PM2019-04-15T22:39:26+5:302019-04-15T22:39:41+5:30
ग्रामीण भागात कलेचे अनेक उपासक आहेत. उच्च दर्जाची कला अंगी असुनही वाट्याला उपेक्षा येते. पण, गोंडपिपरी तालुक्यातील एका शिल्पकाराने कला सार्थकी लावून समाजभान जोपासले. निर्जीव लाकडात प्राण फुंकणाऱ्या ऋषीक वारलू मेश्राम यांच्या कलाकृतीने अनेकांना भुरळ घातली त्याने लाकडात साकारलेला अशोकस्तंभ सध्या चर्चेत आहे. हा कलावंत देवी, देवता, महापुरुष, निसर्ग देखावे लाकडावर हुबेहूब चितारतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
धाबा : ग्रामीण भागात कलेचे अनेक उपासक आहेत. उच्च दर्जाची कला अंगी असुनही वाट्याला उपेक्षा येते. पण, गोंडपिपरी तालुक्यातील एका शिल्पकाराने कला सार्थकी लावून समाजभान जोपासले. निर्जीव लाकडात प्राण फुंकणाऱ्या ऋषीक वारलू मेश्राम यांच्या कलाकृतीने अनेकांना भुरळ घातली त्याने लाकडात साकारलेला अशोकस्तंभ सध्या चर्चेत आहे. हा कलावंत देवी, देवता, महापुरुष, निसर्ग देखावे लाकडावर हुबेहूब चितारतो.
हिवरा हे सधन शेतकऱ्यांने गाव म्हणून ओळखल्या जाते. ऋषीने साकारलेल्या कलाकृतीमुळे हे गाव प्रकाशझोतात आहे. ऋषी मेश्राम यांचे वडील वारलू मेश्राम हे सुतारकाम करतात. त्यामुळे बालपणापासून ऋषी लाकडावर हात फिरवू लागला होता. बघताबघता तो लाकडावर विविध कलाकृती उतरवू लागला. दरम्यान काष्ठ शिल्प कलेचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतले.
प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या कलेला बहर येऊ लागला. लाकडावर तो देवी, देवता, महापुरुषांची प्रतिमा व निसर्ग देखावे हुबेहुब कोरत असल्याने ग्राहकांचा ओढा वाढला आहे.
लाकडी दरवाजा बनविताना त्यावर ग्राहकांना हवी ती कलाकृती ऋषी कोरत असतो. ऋषीच्च्या ामात भाऊ शांताराम यांची मोठी मदत असते. ऋषीची कला बघून धाबा ग्रामपंचायतचे सदस्य संतोष झाडे यांनी अशोकस्तंभाचे छायाचित्र दाखवून ते लाकडात कोरुन देण्यास सांगितले.
अशोकस्तंभाची प्रतिमा लाकडात हुबेहुब उतरविण्याचे आव्हान ऋषीने सहजतेने पेलले. चार महिन्याच्या कालावधीत त्याने सहा फूटाचा देखणा लाकडी अशोकस्तंभ कोरला. या स्तंभावर चार सिंहाची मुखे असून त्याखालीच धम्मचक्र, हत्ती, सिंह, बैल, घोडा कोरला आहे. हे शिल्प नागरिकांच्या आकर्षणाचा विषय झाला. झाडे यांनी हा देखणा अशोकस्तंभ धाबा येथील सार्वजनिक बौद्ध विहाराला दान दिला आहे.