नांदा येथे डेंग्यूचा वाढता प्रकोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:25 AM2021-07-26T04:25:57+5:302021-07-26T04:25:57+5:30
जुलै ते ऑक्टोबर महिन्यात डेंग्यू, मलेरिया या तापाच्या आजाराची साथ असते. आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेकरिता जनजागृतीच्या माध्यमातून विशेष मोहीमही राबविली ...
जुलै ते ऑक्टोबर महिन्यात डेंग्यू, मलेरिया या तापाच्या आजाराची साथ असते. आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेकरिता जनजागृतीच्या माध्यमातून विशेष मोहीमही राबविली जाते. नांदा येथे मागील एक महिन्यापासून डेंग्यू तापाची साथ आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून सातत्याने यावर प्रकाश टाकण्यात आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेने दखल घेतली असून, मागील चार दिवसांपासून २० जणांची टीम कार्यरत आहे.
बॉक्स
आशा वर्करसह आरोग्य कर्मचारी देत आहे घरोघरी भेट
मागील काही दिवसांपासून नांदा येथे डेंग्यूचा वाढता प्रकोप पाहता आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, गावातील आशा वर्करसह आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना मार्गदर्शन करून कोरडा दिवस पाळण्याबाबत, स्वच्छता ठेवण्याबाबत व डासांची उत्पत्ती रोखण्याकरिता कार्य करीत आहेत.
कोट
गावात डेंग्यूचा प्रसार होत असल्याचे लक्षात येताच गावात जनजागृती फलक, धूर फवारणी व दवंडी वारंवार देण्यात येत आहे. ग्रामपंचायत कर्मचारीसुद्धा डेंग्यूचा प्रकोप कमी व्हावा, यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे.
-पी. जी. गेडाम, ग्रामविकास अधिकारी, नांदा.
कोट
आरोग्य यंत्रणा डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्याकरिता प्रयत्नरत आहे. नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने अद्यापही येथील डेंग्यूची साथ नियंत्रणात आली नसल्याने काही रुग्णांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारार्थ चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. कोणत्याही रुग्णाचे प्राण जाऊ नयेत, यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
-डाॅ. स्वप्नील टेंभे, तालुका आरोग्य अधिकारी.