पेरलेली बियाणे करपण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 10:23 PM2018-06-16T22:23:51+5:302018-06-16T22:25:11+5:30
मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाला सुरुवात झाली. राजुरा तालुक्यातील बहुतांश गावांत चार दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने कपाशीची लागवड तर काहींनी सोयाबीन पेरणी केली. परंतु आठवडाभरापासून पाऊस गायब झाल्याने दाणे जमिनीतून उगवण्यापूर्वीच कोमेजण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाला सुरुवात झाली. राजुरा तालुक्यातील बहुतांश गावांत चार दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने कपाशीची लागवड तर काहींनी सोयाबीन पेरणी केली. परंतु आठवडाभरापासून पाऊस गायब झाल्याने दाणे जमिनीतून उगवण्यापूर्वीच कोमेजण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
यावर्षी पाऊस भरपूर पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाला प्रारंभ झाला. तीन-चार दिवस चांगला पाऊस पडला. त्यामुळे शेतीकामांना चांगलाच वेग येऊन राजुरा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यावर्षी निसर्ग शेतकऱ्यांना साथ देईल असे वाटत असतानाच पावसाने खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच हुलकावणी दिल्याचे दिसून येत आहे.
गेल्यावर्षी बोंडअळीच्या तडाख्याने शेतकरी हतबल झाला. उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला. यावर्षी उसनवारी व कर्ज काढून महागडे बियाणे जमिनीत टाकले. मात्र आठवडा उलटायला आला तरी पावसाचा पत्ता नाही. पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पाऊस येईल, अशी आस शेतकऱ्यांना लागली.
हवामान खात्याने २० जून नंतरच पाणी येईल, असा अंदाज वर्तविला आहे. कपाशीचे बीज अंकुरण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांनी विकत घेतलेले महागडे बियाणे मातीमोल होण्याचा धोका आहे. शेतकºयांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. हे शेतकऱ्यांचे धगधगते वास्तव आजही कायम आहे.
निसर्गाने ऐनवेळी दगा दिल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. यावर्षी शेतकºयांकडे बियाणे घ्यायला पैसे नव्हते. उसणवारी करुन पैशाची जुळवाजुळव केली. मात्र पाऊस असा अचानक बेपत्ता झाल्याने श्ेतकरी पूर्णत: निराश झाला आहे. खरीप हंगामाच्या ऐन तोंडावर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला.
मृगाचा पाऊस पडल्याने दीर्घ उघडीप होईल. त्यामुळे पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. परंतु, हा संदेश शेतकºयांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे सुरुवातीला नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दुबार पेरणीचे संकट
मृगाचा पाऊस बरसल्यानंतर शेतकºयांनी लगबगीने कपासीची लागवड केली. त्यानंतर सलग चार दिवस बºयापैकी पाऊस आला. यावर्षी निसर्ग शेतकºयांना साथ देईल, असे वाटत असतानाच पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. पाऊस आला नाही, तर दुबार पेरणी करण्याची वेळ काही शेतकºयांवर येऊ शकते.
उन्हाचा तळाखा
पेरणी करणारे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. तर दुसरीकडे प्रचंड उन्ह तापत असल्याने पेरलेल्या बियाण्यांचे काय होणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. पावसाने दीर्घ खंड दिल्यास बियाणे जमिनीत खराब होण्याची शक्यता आहे. दरम्यान बºयाच शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. पुरेसा पाऊस आल्यास पेरणीची लगबग सुरू होईल.