पुरेशा पाण्याअभावी पांढरे सोने करपण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:10 AM2018-10-24T01:10:46+5:302018-10-24T01:11:20+5:30

कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे कापशीची हजारो हेक्टर शेती करपायला लागली आहे. यंदा पुरेसा पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने पहिलेले स्वप्न मातीमोल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

The risk of whitening gold due to lack of adequate water | पुरेशा पाण्याअभावी पांढरे सोने करपण्याचा धोका

पुरेशा पाण्याअभावी पांढरे सोने करपण्याचा धोका

Next
ठळक मुद्देपाण्याची पातळी खालावली : कापसाच्या उत्पादनात मोठी घट होणार

प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी: कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे कापशीची हजारो हेक्टर शेती करपायला लागली आहे. यंदा पुरेसा पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने पहिलेले स्वप्न मातीमोल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राजुरा तालुक्यात कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे दिसत आहे.
राजुरा तालुका हा कापूस पिकासाठी अग्रेसर मानला जातो. येथील शेतकरी काळ्या आईच्या कुशीत पांढरे सोने पिकवितो. तरीही शेतकऱ्यांची ससेहोलपट संपली नाही. कोरडवाहू शेतीचे दिवस संपल्याने पावसाअभावी कृषी क्षेत्रावरच अवकळा आली आहे. राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूसाचे उत्पादन घेतले जाते. कापूस पिकावरच येथील शेतकऱ्यांचा वर्षभराचे आर्थिक बजेट अवलंबून असते. यावर्षी शेतकऱ्यांनी शेतीवर बराच खर्च केला आहे. उसनवारी व कर्ज काढून अनेक शेतकºयांनी शेती केली आहे. कापसाला बऱ्यापैकी भाव आहे. परंतु कपासीला आवश्यक पुरेसा पाऊस न आल्याने शेती पिकणार की नाही ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कापूस पिकांना आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. काही शेतकऱ्यांचा कापूस निघाला तर बहुतांश कपाशीला आता फळधारणा होत आहे. त्यासाठी सध्या पिकांना पावसाची गरज आहे. पाऊस आला नाही तर कापसात मोठी घट होणार असून त्याचा सर्वाधिक फटका राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. पाऊस नसल्याने कापूस पीक पूर्णत: वाळायला लागले आहे. जमिनीला भेगा पडू लागल्या. कृषी विभागाने हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकºयांमध्ये जागृती घडवून आणली होती.
बऱ्याच शेतकऱ्यांनी यातून पिकांचे नियोजन केले. यंदा विविध कीडरोगांचा अनिष्ट परिणाम झाला नाही. मात्र सिंचनाअभावी कापूस मार खाणार आहे. विहिर असणारे शेतकरीदेखील पाण्याअभावी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

कापूस उत्पादनासाठी आवश्यक तेवढा पाऊस यंदा आला नाही.विहिरी कोरड्या पडत आहेत. हजारो हेक्टर शेतातील कापसीची पिके वाळायला लागली आहे. यंदा कापसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असून त्याचा आर्थिक फटका शेतकºयांना बसणार आहे. कृषी विभागाने सर्वेक्षण करावे
- नागोबा घटे, शेतकरी
हिरापूर (निंबाळा)

Web Title: The risk of whitening gold due to lack of adequate water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस