चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांना पूर; शेकडो घरे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

By राजेश भोजेकर | Published: July 21, 2024 12:20 PM2024-07-21T12:20:35+5:302024-07-21T12:21:08+5:30

चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी नदीला पूर, भिसी-चिमूर मार्ग बंद झाले आहे.

Rivers in Chandrapur district flooded life disrupted | चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांना पूर; शेकडो घरे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांना पूर; शेकडो घरे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

चंद्रपूर : सुमारे तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या कधी संततधार तर कधी मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा व पिंपळनेरी या नद्यांना पूर आला. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील मामा तलावाची पाळ फुटल्याने सुमारे ३०० घरात पाणी शिरल्याने गावकऱ्यांची तारांबळ उडाली. जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्य सुरू झाले आहे. 

चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी नदीला पूर, भिसी-चिमूर मार्ग बंद झाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील एक नवीन डांबरी रस्ता वाहून गेला. मूल तालुक्यातील अंधारी नदीला पूर आल्याने चंद्रपूर-मूल, जानाळा-सुशी, मूल-करवन, मूल सावली, राजोली - पेटगाव मार्ग बंद झाले आहे. मूलमधील रामपूर वॉर्डात पुराचे पाणी शिरल्याने मोठी अडचण निर्माण झाली. मूल-चंद्रपूर मार्गावरील आगडी येथील तलावाचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील दूधवाही रेल्वेच्या अंडरपास पुलामध्ये पाणी, नागरिकांना ये - जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. चंद्रपूर तालुक्यात वर्धा नदीवरील धानोरा नजीकच्या पुलावर पाणी,  चंद्रपूर - भोयेगाव ते गडचांदूर तसेच कोरपना मार्ग बंद झाला आहे. मूल तालुक्यातील उमा नदीला पूर, मूल- ब्रह्मपुरी मार्गही बंद झाला आहे. रात्रभर संततधार पाऊस झाल्याने वर्धा नदीला पूर. वरोरा - वडकी मार्ग बंद झाला आहे. मूल तालुक्यातील अंधारी नदीच्या पुराचे पाणी पोंभुर्णा तालुक्यातील शेतात. पोंभुर्णा-वेळवा व थेरगाव मार्ग बंद. सिंदेवाही तालुक्यात जामसळा नदीला पूर आल्याने जुना जामसळा गावात पाणी शिरले. सिंदेवाही तालुक्यातील पांढरवाणी येथील तलावाची पाळ फुटली असून तलावातील पाणी वाहून गेले.

Web Title: Rivers in Chandrapur district flooded life disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.