चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये आरओ मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:27 PM2018-02-24T23:27:44+5:302018-02-24T23:27:44+5:30

राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने महापारेषण कंपनीच्या सीएसआर निधीतून चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये आरओ मशीन बसविण्यात येणार आहेत.

RO machine in 50 villages in Chandrapur taluka | चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये आरओ मशीन

चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये आरओ मशीन

googlenewsNext
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार : प्रत्येक नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने महापारेषण कंपनीच्या सीएसआर निधीतून चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये आरओ मशीन बसविण्यात येणार आहेत.
बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यादृष्टीने प्रत्येक गावात आरओ मशीन बसविण्याचा मनोदय अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे. नुकतेच पोंभुर्णा शहरात नगर पंचायतीच्या इमारतीत नागरिकांसाठी आरओ मशीनचे लोकार्पण त्यांनी केले आहे. मूल तालुक्यातील उथळपेठ आणि चिचाळा या आदर्श गावांमध्येसुद्धा आरओ मशीन लोकार्पित करण्यात आल्या. महापारेषण कंपनीच्या सीएसआर निधीतून चंद्रपूर तालुक्यातील ज्या ५० गावांमध्ये आरओ मशीन बसविण्यात येणार आहे, त्यात वरवट, चेक निंबाळा, निंबाळा, वायगांव, चेक वायगांव (दुधाळा), लोहारा, बोर्डा चेक बोर्डा, वलनी, घंटाचौकी, चिचपल्ली, जांभार्ला, अजयपूर, टेमटा, नागाळा म., महादवाडी, गोंडसावरी, पिंपळखूट, हळदी, नंदगूर, कोळसा, डोनी, जुनोना, मोहर्ली, उर्जानगर, नेरी, र्जानगर, समता नगर, आयुषनगर, कोंडी, चांदसुर्ला, आंबोरा, लखमापूर, दुगार्पूर वार्ड नं १ मध्ये चंदूबाबा मठाजवळ, दुर्गापूर वार्ड नं. २ मध्ये आंबेडकर चौक, दुर्गापूर वार्ड नं. २ मध्ये आझाद चौक, दुर्गापूर वार्ड नं. १ मध्ये ग्राम पंचायत परिसर, दुर्गापूर वार्ड नं. ४ मध्ये दलित वस्ती, दुर्गापूर वार्ड नं. ५ मध्ये हनुमान मंदिराजवळ, दूर्गापूर वॉर्ड नं. ६ मध्ये बुध्दविहाराजवळ, कढोली, भटाळी, पेठ, झरी, पाहमी, पायली, चिचोली, वढोली, चोरगांव, मामला, अडेगाव या गावांचा समावेश आहे.
अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी सहन कराव्या लागत असल्याने प्रत्येक गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, असा संकल्प ना. मुनगंटीवारांनी केला आहे. या संकल्पपूर्तीच्या दृष्टीने ते याबाबतची गतीने अंमलबजावणीही करीत आहेत.

Web Title: RO machine in 50 villages in Chandrapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.