प्रकल्पबाधित ५१ गावात आरओ वॉटर एटीएम मशिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 10:23 PM2018-12-25T22:23:14+5:302018-12-25T22:23:33+5:30
चंद्र्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राअंतर्गत प्रभावित प्रकल्पग्रस्त गावांमधील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी महाऔष्णिक केंद्राच्या व्यवस्थापनाकडून सामाजिक दायित्व निधीद्वारे आरओ वॉटर एटीएम लावण्यात येणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांमुळे ५१ प्रकल्पग्रस्त गावांमध्ये ४ कोटी ६४ लाख ८८ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्र्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राअंतर्गत प्रभावित प्रकल्पग्रस्त गावांमधील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी महाऔष्णिक केंद्राच्या व्यवस्थापनाकडून सामाजिक दायित्व निधीद्वारे आरओ वॉटर एटीएम लावण्यात येणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांमुळे ५१ प्रकल्पग्रस्त गावांमध्ये ४ कोटी ६४ लाख ८८ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र शेकडो प्रकल्पग्रस्त नागरिकांनी पिण्यासाठी अशुद्ध पाणी मिळत असल्याच्या तक्रारी ना. अहीर यांच्याकडे केल्या होत्या. या पेयजलामुळे गावकऱ्यांना विविध जलजन्य आजारांचा सामना करावा लागत असल्याचेही ग्रामस्थांनी लक्षात आणून दिले. या प्रश्नाची दखल घेऊन ना. अहीर यांनी केंद्राच्या व्यवस्थापनासोबत बैठक घेतली. सीएसआर निधीतून या गावांमध्ये आरओ वॉटर एटीएम मशिनची उपलब्धता करावी, अशी सूचना केली होती.
प्रभावित गावांच्या यादीसह सीटीपीएस व्यवस्थापनाकडे पत्र सादर करून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सीटीपीएस व्यवस्थापनाने प्रकल्पपिडित गावांची यादी महानिर्मिती मुख्यालयाला सादर केली होती. सीएसआर कार्यकारी मंडळाने सदर प्रस्ताव मंडळाच्या माध्यमातून सादर केला होता.
या प्रस्तावाला संचालक मंडळाने एका ठरावाद्वारे मान्यता प्रदान केली. भद्रावती, चंद्र्रपूर तालुक्यातील सुमारे ५१ प्रकल्प प्रभावित गावांसाठी ४ कोटी ६४ लाख ८८ हजार रूपयांचे आरओ वॉटर एटीएमकरिता मंजूर केले. हे आरओ वॉटर एटीएम लवकरच कार्यान्वित केले जातील, असे सीटीपीएस व्यवस्थापनाने स्पष्ट केले. दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी जनसुविधेसाठी महत्त्वपूर्ण असलेले आरओ वॉटर एटीएम कार्यान्वित होतील, याकडे संबंधित अधिकाºयांनी लक्ष द्यावे, असे निर्देश दिले आहेत.