उड्डाणपुलाचा वळणरस्ता वाहतुकीस अयोग्य

By admin | Published: September 17, 2016 01:28 AM2016-09-17T01:28:43+5:302016-09-17T01:28:43+5:30

राजुरा ते बामणी दरम्यान आंतरराज्यीय मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम तीन वर्षापासून कासवगतीने सुरू आहे

Road accident of the flyover is inappropriate | उड्डाणपुलाचा वळणरस्ता वाहतुकीस अयोग्य

उड्डाणपुलाचा वळणरस्ता वाहतुकीस अयोग्य

Next

चालकाचे बेहाल : कंत्राटदार व अभियंता कुंभकर्णी झोपेत
राजुरा : राजुरा ते बामणी दरम्यान आंतरराज्यीय मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम तीन वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. त्यासाठी तयार केलेला वळण रस्ता पावसाच्या पहिल्या सरीने उखडून मोठे खड्डे पडले. त्यात पाणी साचल्यामुळे वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. वाहनाची तुटफुट व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र कंत्राटदार व अभियंता कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे पावसाळा संपल्यानंतर तरी दुरुस्तीसाठी जाग येणार काय, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
राजुरा-बामणी या आंतरराज्यीय मार्गावर रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम धुमधडाक्यात सुरू करण्यात आले होते. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या निष्क्रीयतेमुळे बांधकामास ग्रहण लागले. वास्तविक पाहता करारनाम्यानुसार दोन वर्षात बांधकाम पूर्ण करावयाचे होते. परंतु, तीन वर्ष झाले तरीपण काम अर्धवट आहे. बांधकामास अडचण येवू नये यासाठी पर्यायी वळण रस्त्याची तरतुद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. त्यानुसार अंतरराज्यीय मार्गावरील वाहतुकीच्या क्षमतेनुसार रस्ता तयार करून घेणे अभियंत्याचे कर्तव्य होते.
हा रस्ता थातूरमातूर तयार करण्यात आला असून तीन वर्षापासून पावसाळ्यात वळण रस्ता दबून उखडत आहे. पावसात खड्यात पाणी साचून वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. परंतु, दररोज येणेजाणे करणाऱ्या अधिकाऱ्यांना रस्ता दिसत नाही. त्यामुळे नागरिकांची चांगलीच कसरत होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Road accident of the flyover is inappropriate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.