अतिक्रमणामुळे रस्ता बंद
By admin | Published: June 9, 2017 12:54 AM2017-06-09T00:54:55+5:302017-06-09T00:54:55+5:30
आवारपूर: अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने सीसीआर फंडाअंतर्गत मागील एक वर्षापूर्वी २५ लक्ष रुपये खर्च करुन
लोकमत न्यूज नेटवर्क
आवारपूर : आवारपूर: अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने सीसीआर फंडाअंतर्गत मागील एक वर्षापूर्वी २५ लक्ष रुपये खर्च करुन वॉर्ड क्र. ४ मध्ये सांस्कृतिक भवन बांधले. मात्र या भवना मागील सरकारी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याचे अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहेत.
सांस्कृतिक भवनासमोरील रस्त्यावरील वालदे यांच्या घरासमोर फूल व फळाचे झाडे लावली होती. त्याचा नागरिकांना त्रास नव्हता. मात्र ग्रामपंचायतने त्यांना नोटीस देवून रस्त्यावर लावलेली झाडे कापण्यास बाध्य केले. परंतु भवना मागे काही लोकांनी रस्त्यावरच्या नालीवर अतिक्रमण केले आहे. पावसाळ्यात या भागात नाली पूर्णपणे भरुन त्या पाण्याचा निचरा, काही नागरिकांच्या घरात होत असतो. नालीचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचते. त्यामुळे अनेक वर्षांपासून ही समस्या सोडविण्याची मांगणी होत आहेत.
रस्त्यावर माती, टाकल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहेत. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता वाढली आहे. याकडे ग्रामपंचायत सदस्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. वॉर्डातील नागरिक आपसात वैर निर्माण होणार म्हणून गप्प आहेत. परंतु रस्त्यावर व नालीवर बांधकाम करणाऱ्याचे आपली भिंत पडेल, अशी भीतीसुद्धा त्यांना वाटत नाही. वेळीच लक्ष देवून पावसाळा व शाळा सुरु होण्याआधी हे अतिक्रमण काढण्याची वाट वॉर्डातील नागरिक पाहत आहेत.
वॉर्ड क्र. ४ मधील अतिक्रमण अतिशय गंभीर आहे. अनेकदा अतिक्रमण काढण्याचा प्रयत्नसुद्धा झाला. परंतु प्रशासनाची साथ न लाभल्याने अतिक्रमण वाढत आहे. अतिक्रमण काढण्यास नागरिकांना सोयीचे होईल.
- मारोती बुदे, सामाजिक कार्यकर्ते
माझ्या घरासमोर मी तीन-चार फूल व फळांची झाडे लावली होती. परंतु ग्रामपंचायतने रस्त्यावर असलेली झाडे काढावी, अशी नोटीस पाठविली. त्यामुळे मी झाडे तत्काळ कापली. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावात अतिक्रमण आहे, हे त्यांना अजिबात दिसत नाही.
- विक्की वाल्हे, नागरिक