चंद्रपूर जिल्ह्यात पुलावरील रस्ता खचला; वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 11:53 AM2019-07-02T11:53:27+5:302019-07-02T11:54:33+5:30
मान्सूनने हजेरी लावल्याबरोबर शंकरपूर ते भिवापूरकडे जाणारा मार्ग मंगळवारी (दि. २) सकाळी एका पुलावरून खचला असून येथे वाहतूक कोंडी झाली आहे.
Next
ठळक मुद्देशंकरपूर-कोलारी-भिवापूरकडे जाणारा मार्गरस्ता बनवून वर्षही लोटले नव्हते
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: मान्सूनने हजेरी लावल्याबरोबर शंकरपूर ते भिवापूरकडे जाणारा मार्ग मंगळवारी (दि. २) सकाळी एका पुलावरून खचला असून येथे वाहतूक कोंडी झाली आहे.
शंकरपूर ते कोलारी असा हा मार्ग असून मंगळवारी सकाळी शंकरपूर-जवरबोडी दरम्यान असलेल्या एका पुलापाशी तो खचल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. या मार्गावरून आता जड वा अन्य प्रकारची वाहतूक करणे धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. या पुलाखालून गोसेखुर्द धरणाचा एक कॅनॉल दुथडी भरून वाहतो आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची गेल्या काही महिन्यांपूर्वीच डागडुजी करण्यात आल्याचे नागरिकांचे सांगणे आहे.