चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:45 AM2019-07-27T00:45:56+5:302019-07-27T00:46:55+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात जाण्याकरिता वर्धा नदीवरील मार्डा गावाजवळ बंधारा बांधण्यात आला आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात तसेच यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु वरोरा ते मार्डा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात जाण्याकरिता वर्धा नदीवरील मार्डा गावाजवळ बंधारा बांधण्यात आला आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात तसेच यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु वरोरा ते मार्डा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीमधून वर्धा नदी वाहते. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांना वरोरा बाजार पेठ जवळ पडते. परंतु वर्धा नदीवर पूल नसल्याने आजपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक वरोरा शहराकडे फारसे येत नव्हते. काही वर्षापूर्वी वरोरा तालुक्यातील मार्डा गावाजवळ वर्धा नदीवर बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयावरुन हलके चार चाकी, दुचाकी व बैलबंडी सहज नेता येत असल्याने व वरोरा शहराचे अंतर कमी असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील हिवरा, मसरा, कामींडा, चोपन आदी गावांतील नागरिक विविध कामांसाठी वरोरा शहरात येतात. त्यामुळे सध्या वरोरा बाजारपेठेला सुगीचे दिवस आले आहे. मात्र वर्धा नदीच्या बंधाºयापासून तर वरोरा शहराजवळील माझरी रस्त्यापर्यंत सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. अनेक ठिकाणी रस्ता दबला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहन चालविने वाहन धारकांना कठीण झाले आहे.
मार्डा रस्त्यालगत समाज भवन, नामांकित इंग्रजी माध्यमांची शाळा व तिन जिनिंग आहे. यासोबतच वरोरा परिसरातील नागरिकांच्या शेतात जाण्याकरिता या रस्त्याचा उपयोग केला जातो. मागील काही वर्षांपासून या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र याकडे संबंधित विभाग लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष परसला आहे.