निधीअभावी रस्त्यांचे बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:29 AM2020-12-06T04:29:25+5:302020-12-06T04:29:25+5:30
जिल्हा परिषदकडे अहवाल पाठवून निधीची तरतूद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वीज पुरवठा सुरळीत करावा राजुरा : ...
जिल्हा परिषदकडे अहवाल पाठवून निधीची तरतूद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वीज पुरवठा सुरळीत करावा
राजुरा : वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयतंर्गत काही गावांंमध्ये वीज बंद राहत असल्याने कृषी पंपांवर परिणाम झाला आहे. भाजीपाला पिकांना पाणी देणे कठीण झाले. ही समस्या दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रवाशी निवाऱ्याअभावी प्रवाशांचे हाल
भद्रावती: तालुक्यातील काही गावांमध्ये निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. राज्य परिवहन मंडळाने गावागावात पाहणी करून निवारा शेड उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी केली जात आहे.
स्वच्छता मोहीम राबवावी
ब्रह्मपुरी : मागील काही महिन्यांपासून स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतने स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
घरकूल प्रकरणांचा निपटारा करा
जिवती : तालुक्यातील रमाई आवास योजना व शबरी आदिवासी घरकूल योजनेसाठी आवश्यक कापदपत्र जमा करूनही प्रकरणे प्रलंबित आहेत. तर काही प्रकरणे मंजूर झाली असून बांधकामे अर्धवट आहे. त्यामुळे या प्रकरणांचा निपटारा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
खेड्यापाड्यातील गरीब गरजू लोकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून रमाई आवास योजना व शबरी आदिवासी घरकूल योजना सुरू आहेत. जिवती तालुक्यात यासाठी गरजू लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्र मागविण्यात आले. परंतु, पात्र कुटुंबांना योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप केला जात आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
चंद्रपूर : रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले. स्थानिक प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.
कोरपना-वणी
बससेवा सुरू करा
कोरपना : कोरपना व वणी येथून सायंकाळी बसफेरी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या मार्गावरील लालगुडा, वाघदरा, मंदर, केसुर्ली, चारगाव चौकी, शिरपूर, कुरई, आबई, वेळाबाई आदी गावे येतात.