ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:38+5:302021-06-11T04:19:38+5:30
काळी गिट्टी, वाळू, माती, विटा याची बिनादिक्कत प्रमाणापेक्षा अधिक वाहतूक होत आहे. चोरटी वाहतूक याभागात मोठ्या प्रमाणात होत आहे. ...
काळी गिट्टी, वाळू, माती, विटा याची बिनादिक्कत प्रमाणापेक्षा अधिक वाहतूक होत आहे. चोरटी वाहतूक याभागात मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या प्रमाणापेक्षा अधिक वाहतूक करणारी वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ओव्हरलोड वाहनांमुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बनविलेल्या रस्त्यांची दुर्दशा होत आहे. याकडे संबंधित परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळेच अशी वाहतूक फोफावली आहे. एखादी अपघाताची मोठी घटना घडल्यानंतरच कारवाईचे सोंग संबंधित विभागाकडून घेतले जाते, ही वस्तुस्थिती आहे.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अशा वाहनांवर ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. वेळीच लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर अंकुश ठेवल्यास अशा वाहतुकीला आळा बसणार आहे. ओव्हरलोड वाहतूक करण्यासाठी सोयीस्कर रस्ते असल्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त वाहतूक राजरोसपणे होत आहे.
===Photopath===
100621\img20210528061913.jpg~100621\img20210609133822.jpg
===Caption===
ओव्हर लोड वाहतूक करताना~ओव्हरलोड वाहणामुळे रस्तेला जागो जागी खड्डे पडले आहे