रस्त्याअभावी अडत आहे ग्रामीणांचा प्रवास

By admin | Published: November 26, 2014 11:04 PM2014-11-26T23:04:20+5:302014-11-26T23:04:20+5:30

ग्रामीण विभागातील रस्त्यांची अवकळा आजही संपली नाही. जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खडतर आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकही गावात जाण्यास तयार नसल्याने ग्रामीण नागरिकांना त्रास

The road to rural roads is blocked due to lack of roads | रस्त्याअभावी अडत आहे ग्रामीणांचा प्रवास

रस्त्याअभावी अडत आहे ग्रामीणांचा प्रवास

Next

चंद्रपूर :ग्रामीण विभागातील रस्त्यांची अवकळा आजही संपली नाही. जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खडतर आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकही गावात जाण्यास तयार नसल्याने ग्रामीण नागरिकांना त्रास सहन करत शहर गाठावे लागते. मात्र रस्ता दुरुस्त करण्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याची स्थिती सध्या जिल्ह्यात आहे.
रस्ता नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावात आजही शासनाची बस पोहोचत नाही. त्यामुळे नागरिकांना आजही पायदळ प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. राजुरा तालुक्यातील चिंचोली-निंबाळा, हिरापूर, चार्ली-निर्ली, साखरी-चिंचोली, कळमना, चिंचोली, चिंचोली-निमणी या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाल्याने रस्त्याअभावी या गावांमध्ये बस पोहोचत नसल्याचे विदारक वास्तव आहे. गावागावात रस्ते पोहोचले. मात्र, रस्त्याची अवस्था बघितली तर रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. एवढी रस्त्याची वाट लागली आहे. चिंचोली-कळमना हा मार्ग गडचांदूरला जाण्यासाठी सोयीचा आहे. मात्र, या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरुस्ती करण्यात न आल्याने रस्त्याचे बारा वाजले आहे. शासनाची गाव तिथे एसटी बस अशी योजना आहे. मात्र, अनेक गावात बस जायला रस्ते नसल्याने नागरिकांना आजही पायदळ प्रवास करावा लागतो.
राजुरा तालुक्यातील निंबाळा, हिरापूर या गावाने अजूनपर्यंत गावात एसटी बस बघितली नाही. यावरून गावात रस्त्याची किती वाईट अवस्था आहे हे लक्षात येते. अनेकदा रस्त्याची तात्पूर्ती डागडुजी करून खड्डे बुजविले जातात. मात्र, अल्पावधीत रस्त्यांना अवकळा येते. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे सरकारी यंत्रणा लक्ष देईल की असाच यातनामय प्रवास नागरिकांना करावा लागणार, हा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला छळत आहे.
मूल तालुक्यातील अनेक गावांची तसेच कोरपना तालुक्यातील नवेगाव (बाखर्डी) येथील मार्गाची दुरवस्था झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या मार्गावर खड्डे पडले असून वाहनधारकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडेही केली. मात्र, अद्यापही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. संंबंधित विभागाने गंभीर दखल घ्यावी, अशई मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The road to rural roads is blocked due to lack of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.