रस्ता सुरक्षा अभियान ही लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:45 PM2019-02-04T22:45:05+5:302019-02-04T22:45:28+5:30

रस्ते अपघात हे देशापुढील मोठे आव्हान असले तरी शासनस्तरावर वाहतूक नियमांवर प्रभावी अंमल व वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना राबविल्या गेल्यास अपघातांच्या संख्येत आमुलाग्र घट शक्य आहे. वाहतूक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप दिल्यास या अभियानाची फलनिष्पत्ती दखलपात्र ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

Road safety campaign should be a milestone | रस्ता सुरक्षा अभियान ही लोकचळवळ व्हावी

रस्ता सुरक्षा अभियान ही लोकचळवळ व्हावी

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : अपघाताचे प्रमाण वाढले; वाहतूक नियमांचे पालन करा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रस्ते अपघात हे देशापुढील मोठे आव्हान असले तरी शासनस्तरावर वाहतूक नियमांवर प्रभावी अंमल व वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना राबविल्या गेल्यास अपघातांच्या संख्येत आमुलाग्र घट शक्य आहे. वाहतूक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप दिल्यास या अभियानाची फलनिष्पत्ती दखलपात्र ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती चंद्रपूरद्वारा पोलीस मुख्यालयाच्या ड्रील शेड येथे आयोजित ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उदघाटनप्रसंगी ना.अहीर बोलत होते. ते म्हणाले, वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, प्रदूषणावर आळा बसावा, अनियंत्रित वाहन चालविणाºयांवर प्रतिबंध बसावा, याकरिता केंद्र व राज्य शासनाने अनेक कडक नियम अंमलात आणले आहे. वाहतूक नियमांचा भंग करणाºयांविरूध्द मोठ्या प्रमाणात दंडात्मक कार्यवाहीची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी तसेच राज्य शासन रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर कटाक्षाने अंमल करण्याबाबत आग्रही आहे. त्यामुळे अपघातांचे आकडे कमी झाले असले तरी सामाजिकदृष्टया अपघाताचे हे गांभीर्य चिंतेत भर घालणारे असल्याने अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील जबाबदार नागरिकांनी पुढाकार घ्यावा. तसेच शाळा, महाविद्यालयीन स्तरावर सुरळीत वाहतुकीसंदर्भात तसेच अपघातांच्या पार्श्वभूमीवर जागृती व्हावी, यावर भर देत ना. अहीर यांनी जनजागृतीसाठी पथनाटय हे प्रभावी माध्यम ठरू शकते, असे सांगितले.
यावेळी ना. हंसराज अहीर यांना पथसंचालनाद्वारे मानवंदना देण्यात आली. पथनाटयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वाढत्या अपघातांवर नियंत्रण घालण्यासाठी जनजागृती केली. यावेळी निघालेल्या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून ना. अहीर यांनी रॅली रवाना केली. या कार्यक्रमाला महापौर अंजली घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्यासह वाहतूक, पोलीस, कर्मचारी आदींची उपस्थिती होती. चंद्रपूर महानगरातील १२ शाळांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक, पालकांची उपस्थिती होती.
पाल्यांना वाहन देताना काळजी घ्या
रस्ता सुरक्षा हे संबंधित विभागाचे कर्तव्य असले तरी सामाजिक पातळीवर लोकांची याबाबतीत जबाबदारी अनिवार्य ठरते, असे ना. हंसराज अहीर यांनी सांगितले. पालकांनी आपल्या पाल्यांच्या हातात वाहने सोपवितांना त्यांचे वय, वाहतूक नियमांचे ज्ञान व वाहन विषयक त्याची मानसिकता, आकलन याबाबत गांभिर्याने विचार करूनच पाल्यांच्या हातात वाहने सोपवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Road safety campaign should be a milestone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.