घुग्घुसमधील रस्ते अतिक्रमणात गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 06:00 AM2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:44+5:30

चंद्रपूर- घुग्घुस मुख्य रस्त्यावर सर्व्हीस रोडकरिता प्रावधान नसल्याने सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला व्यवसायिक लोकांनी आपली दुकाने थाटली आहे. त्यामुळे रात्रंदिवस चालत असलेल्या वाहतुकीमुळे व त्याच रस्त्यावर जड वाहने उभी राहत आहे. एकेरी वाहतुकीची व्यवस्था असली तरी सदर रस्त्यावर ट्रान्सपोर्टचे वर्कशॉप व कार्यालये थाटून आहेत. त्यामुळे ट्रकांच्या रांगा लागलेल्या असतात.

Roads in Ghugghus swallowed in encroachment | घुग्घुसमधील रस्ते अतिक्रमणात गिळंकृत

घुग्घुसमधील रस्ते अतिक्रमणात गिळंकृत

Next
ठळक मुद्देसंडे अ‍ँकर। ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, नायब तहसीलदार कार्यालयासमोरच अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : घुग्घुस येथील चंद्रपूर-घुग्घुस-वणी रस्त्याबरोबरच पोलीस ठाणे ते बँक आफ इंडिया रस्त्यावरील महसूल विभागाच्या जमिनीवर व्यावसायिकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच गावातही व्यापाऱ्यांनी नाल्यांवर अतिक्रमण करून ठेवले आहे.
चंद्रपूर- घुग्घुस मुख्य रस्त्यावर सर्व्हीस रोडकरिता प्रावधान नसल्याने सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला व्यवसायिक लोकांनी आपली दुकाने थाटली आहे. त्यामुळे रात्रंदिवस चालत असलेल्या वाहतुकीमुळे व त्याच रस्त्यावर जड वाहने उभी राहत आहे. एकेरी वाहतुकीची व्यवस्था असली तरी सदर रस्त्यावर ट्रान्सपोर्टचे वर्कशॉप व कार्यालये थाटून आहेत. त्यामुळे ट्रकांच्या रांगा लागलेल्या असतात. रस्ता एकेरी असला तरी ट्रकचालक येथून नियमाची पायमल्ली करून विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याने अनेकदा अपघात घडत आहेत.
शिवाजी महाराज चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेकांनी दुकाने थाटली आहेत. त्यातही बसस्थानकाच्या बाजूने वणी रस्त्यावर पेट्रोलपंपवरून विरुद्ध दिशेने वाहने टाकत असल्याने बसस्थानकासमोरही अपघात घडत आहेत. वाहन चालकांमध्ये नेहमी तू तू मै मै होत असते. मात्र वाहतूक शिपाई याकडे कानाडोळा करीत असतात.
एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावरून विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शिवाजी चौक ते बॅँक आफ इंडीया रस्त्यावरील महसूल विभागाच्या जागेवर नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयासमोर अनेकांनी नियमबाह्य मोठमोठे शेड उभे केले आहेत. काहींनी व्यवसायासाठी तर काहींनी चक्क राजकीय पक्षाच्या कामकाजाकरिता हे अतिक्रमण केले आहे. घुग्घुस ग्रामपंचायतीने मुख्य मार्गावरील सांडपाणी वाहून नेणाºया नाल्या भूमिगत केल्या आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरण झाले, मात्र त्या भूमिगत नाल्यावर व्यावसायिक आपल्या दुकानाचे सामान नाल्यावर ठेवत असल्याने वाहनधारकांना रस्त्यावर आपली वाहने उभी करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरील रहदारीला अडचण निर्माण होत आहे. मात्र ग्रामपंचायत याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.

Web Title: Roads in Ghugghus swallowed in encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.