हिरवाईने नटलेले रस्ते वाढवताहेत प्रवासातील रंजकता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:32 AM2021-08-21T04:32:00+5:302021-08-21T04:32:00+5:30
जयंत जेनेकर कोरपना : वनराजीने नटलेल्या, चंद्रपूर जिल्ह्यातील रस्त्यांनी हिरवा शालू पांघरल्याने प्रवासात उत्साहवर्धकता निर्माण होत आहे. त्यामुळे हिरवाईने ...
जयंत जेनेकर
कोरपना : वनराजीने नटलेल्या, चंद्रपूर जिल्ह्यातील रस्त्यांनी हिरवा शालू पांघरल्याने प्रवासात उत्साहवर्धकता निर्माण होत आहे. त्यामुळे हिरवाईने नटलेल्या रस्त्यावर ‘लाँग ड्राइव्ह’चीही क्रेझ तरुणाईत दिसून येत आहे.
यात चंद्रपूर-मूल, चंद्रपूर-मोहुर्ली, बाबुपेठ-जुनोना, चिचपल्ली-कारवा, जुनोना-पोंभुर्णा, मोहुर्ली-आष्टा, भद्रावती-चंदनखेडा, पाटण-भारी, बल्लारपूर-गोंडपिपरी, तोहोगाव-विरूर स्टेशन, राजुरा-असिफाबाद, सिंदेवाही-पाथरी, कोरपना-जिवती, मांगलहिरा-जांभूळधरा, गडचांदूर-नगराळा-जिवती, वरोरा-चिमूर, चंद्रपूर-बल्लारपूर, सिंदेवाही-नवरगाव, बाबुपेठ-विसापूर, येनबोडी-पोंभुर्णा-अजयपूर, जिवती-येल्लापूर, नागभिड-तळोधी-बाळापूर, शेगाव-रामदेगी, सावली-पाथरी, किरमटी मेंढा-अड्याळ, ब्रह्मपुरी-आरमोरी, मूल-चामोर्शी, ब्रह्मपुरी-वडसा-गांगलवाडी, उमरेड-चिमूर, जांभूळघाट-भिसी, कोरपना-आदिलाबाद, मांडवा-रुपापेठ, मूल-सोमनाथ, सिंदेवाही-नलेश्वर आदी निसर्गरम्य मार्गांना पर्यटक अधिक पसंती देताना दिसत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ‘झिम्माड पाऊस... हिरवागार निसर्ग’ याचा आनंद लुटत मन रिफ्रेश करण्यासाठी नागरिक वीकेंड प्लान करीत आहेत. त्यामुळे शनिवार-रविवारला या मार्गावर बऱ्याच ठिकाणी गर्दी दिसून येत आहे. या मार्गावरील पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत.
बॉक्स
रस्त्यांनी फुलांचा दरवळतो सुगंध
जिल्ह्यातील वरोरा - बल्लारपूर दरम्यान असलेल्या रस्त्यावरील दुभाजकावर अनेक रंगीबेरंगी फुलांच्या फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना ‘आनंदाचे डोही, आनंदतरंग’ असा स्वर्गसुखाचा भास फुलांच्या दरवळणाऱ्या सुगंधातून व मनमोहक वातावरणातून होत आहे. त्यामुळे या प्रवासात येथे थांबून भल्याभल्यांना सेल्फीचा मोहही आवरत नाही.