वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे सिंदेवाहीत शांतता भंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:30 AM2021-08-27T04:30:55+5:302021-08-27T04:30:55+5:30
सिंदेवाही : वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे सिंदेवाही शहरातील शांतता भंग पावली असून, धूम स्टाइल दुचाकी पळविल्याने अनेकांचे अपघातदेखील झाले आहेत. ...
सिंदेवाही : वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे सिंदेवाही शहरातील शांतता भंग पावली असून, धूम स्टाइल दुचाकी पळविल्याने अनेकांचे अपघातदेखील झाले आहेत.
अशा टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील शिवाजी चौक ते जुना बसस्थानक, बाजार चौक, नवरगाव रोड, पाथरी रोड, तसेच ग्रामीण रुग्णालय परिसरात काही युवक सुसाट दुचाकी पळवत असतात. जाणीवपूर्वक ध्वनिप्रदूषणाच्या पातळीचे उल्लंघन केले जात आहे. अशांवर मोटार वाहन कायद्यानुसार आर्थिक दंडाची तरतूद केली आहे. त्यामुळे लाऊड स्पीकरसह ज्या कोणत्या माध्यमातून ध्वनिप्रदूषण होऊ शकते, अशांना हा कायदा लागू आहे. मात्र, ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजणारी अचूक यंत्रणा नसल्याने कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे कर्णकर्कश व विभिन्न प्रकारचे प्रेशर हॉर्न सायलेन्सर बसविणाऱ्या दुचाकीवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे टवाळखोर युवकांच्या दुचाकी नागरिकांच्या जिवावर उठल्याचे दिसून येत आहे. अति आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होऊन मानवी जीवनावर व पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे अशांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.