रोहयो कामामुळे मजुरांना मिळतोय दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:19 AM2021-06-19T04:19:53+5:302021-06-19T04:19:53+5:30

तालुक्यात १०० कामे सुरू झाल्याने एकूण ३३८३ मजुरांनी उपस्थिती दर्शविली. घनोटी तुकुम येथे मामा तलाव, मजगी व बोडी खोलीकरणाच्या ...

Rohyo work brings relief to the workers | रोहयो कामामुळे मजुरांना मिळतोय दिलासा

रोहयो कामामुळे मजुरांना मिळतोय दिलासा

googlenewsNext

तालुक्यात १०० कामे सुरू झाल्याने एकूण ३३८३ मजुरांनी उपस्थिती दर्शविली. घनोटी तुकुम येथे मामा तलाव, मजगी व बोडी खोलीकरणाच्या ११ कामांवर ८३८ मजूर, त्याचप्रमाणे देवाडा खुर्द येथे ५३२ मजूर, सातारा भोसले ४२१ तसेच दिघोरी येथील कामावर ४३५ तर बोर्डा बोरकर येथील ३७२ मजुरांनी उपस्थिती दर्शविली.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे यांनी रोहयोच्या कामांकडे प्राधान्याने लक्ष दिलेले असून मजुरांची मजुरीसुद्धा विहीत कालावधीत अदा करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. त्या स्वतः माग्रारोहयोच्या कामावर भेटी देऊन मजुरांना योग्य मार्गदर्शन व समस्या जाणून घेत आहेत. आर्थिक वर्षात तालुक्याने रोहयोअंतर्गत मनुष्यबळ दिवस निर्मितीच्या उद्दिष्टांच्या तुलनेत १२२.६७ टक्के उद्दिष्टपूर्ती करत जिल्ह्यात दुसरे स्थान मिळविले आहे.

Web Title: Rohyo work brings relief to the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.