मिंडाळा येथे रोहयोच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:30 AM2021-05-27T04:30:01+5:302021-05-27T04:30:01+5:30
नागभीड : मिंडाळा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मंगळवारपासून तलाव खोलीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या कामावर पहिल्याचदिवशी ...
नागभीड : मिंडाळा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मंगळवारपासून तलाव खोलीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या कामावर पहिल्याचदिवशी ३५० मजुरांनी हजेरी लावली.
कोरोनामुळे मिंडाळा व कोदेपार या गावांतील मजुरांना मागील दोन महिन्यांपासून कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नव्हता. त्यामुळे दोन्ही गावांतील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे कामांची मागणी लावून धरली होती. मजुरांच्या मागणीचा विचार करून ग्रामपंचायत प्रशासनाने ताबडतोब दखल घेत पंचायत समिती स्तरावर कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून काम करण्यात येईल, असे हमीपत्र पंचायत समितीला लिहून दिले. तसेच ग्रामपंचायतरमार्फत सर्व मजुरांना मास्क पुरवण्यात आले. एवढेच नाही, तर आशा वर्कर यांच्यामार्फत मजुरांचे तापमान व ऑक्सिजनची तपासणी करून त्यांना कामावर घेण्यात आले. या तलाव खोलीकरणाचे भूमिपूजन पं. स. सदस्य प्रणया गड्डमवार
यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच गणेश गड्डमवार, उपसरपंच अर्चना मडावी, ग्रा. पं. सदस्य चित्रा मांदाळे, पौर्णिमा नवघडे, रागिनी मुळे,
सचिव व एस. के. उईके उपस्थित होते.