वैद्यकीय व्यवस्थापनात परिचारिकेची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:52 AM2018-12-19T00:52:10+5:302018-12-19T00:58:32+5:30
परिचारिका रूग्णाला समुपदेशन करून त्यांचा आजार बरा करण्यात महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. असाध्य आजारातही रूग्णाला जगण्याची आशा दाखवित रूग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचे काम परिचारिका करीत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : परिचारिका रूग्णाला समुपदेशन करून त्यांचा आजार बरा करण्यात महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. असाध्य आजारातही रूग्णाला जगण्याची आशा दाखवित रूग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचे काम परिचारिका करीत असतात. त्यामुळे वैद्यकीय व्यवसायात परिचारिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले.
मूल येथील देवनिल स्कूल आॅफ नर्सिंगच्या वतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार देवराव भांडेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून देवनील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. महेश भंडेकर, सचिव डॉ. स्मीता भांडेकर, प्रमुख अतिथी प्राचार्य मेघा कुळसंगे, तहसीलदार राजेश सरवदे, सदस्य घनश्याम जुमनाके, नगरसेवक विनोद कामडे, प्रभाकर वासेकर, कुरेशी, मिलमीले आदी उपस्थित होते.
यावेळी ए.एन.एम. व्दितीय वर्गातील माहे जुलै २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेत महाराष्टÑ राज्यातून प्रथम व व्दितीय आलेल्या ममता जयंद्रनाथ चांदेकर आणि रंजना पत्रुजी कुनघाडकर यांचा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ए.एन.एम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शपथविधी कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भावना टेकाम, संचालन सुरभी झाडे, स्रेहा धोडरे तर उपस्थितांचे आभार शुभांगी जुमनाके यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.