त्या अपहरण नाट्यात पोलिसांचीच भूमिका संशयास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 05:00 AM2021-08-28T05:00:00+5:302021-08-28T05:00:53+5:30
संबंधित विद्यार्थिनी दहाव्या वर्गात आहे. गुरुवारी ती शाळेत जायला निघाली. जांभूळघाट बस स्थनकापासून तिची शाळा काही अंतरावर आहे. शाळेला लागून वस्ती आहे. तो मार्गही रहदारीचा आहे. याच मार्गावर रस्त्यात अज्ञात टाटा सुमो आडवी करून गाडीतील दोन पुरुष व महिलेने कोरोनाची लस घेतली का म्हणून गाडी थांबवतात. मुलीचा हात पकडतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : जांभूळघाट येथील एका विद्यार्थिनीला गुरुवारी सकाळी अज्ञात टाटा सुमोतील व्यक्तीने रस्त्यात अडवून कोरोनाची लस द्यायची आहे म्हणून थांबविले. हा गैरप्रकार तिच्या लक्षात येताच त्या व्यक्तींना झटका मारून तिने पळ काढला. याविषयीचे वृत्त प्रकाशित होताच सर्वत्र खळबळ उडाली. आधी असेच बयाण पीडित मुलीने व कुटुंबीयांनीही दिले. नंतर पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी नेल्यानंतर हे बयाण अचानक बदलले. आता पोलीस असा प्रकार घडलाच नाही, असे सांगत आहे. मात्र गावकरी व पीडित कुटुंबीयांच्या आधीच्या सांगण्यावरून असा प्रकार घडला असावा, असे दिसते. या प्रकरणातील सत्यता समोर येण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
संबंधित विद्यार्थिनी दहाव्या वर्गात आहे. गुरुवारी ती शाळेत जायला निघाली. जांभूळघाट बस स्थनकापासून तिची शाळा काही अंतरावर आहे. शाळेला लागून वस्ती आहे. तो मार्गही रहदारीचा आहे. याच मार्गावर रस्त्यात अज्ञात टाटा सुमो आडवी करून गाडीतील दोन पुरुष व महिलेने कोरोनाची लस घेतली का म्हणून गाडी थांबवतात. मुलीचा हात पकडतात. मात्र इंजेक्शन देत असताना झटका मारून मुलगी पळ काढते. त्यानंतर ती टाका सुमो सुसाट वेगाने पुढे जाते. ही बाब गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर खुद्द आरोग्य विभागाच पोलिसात तक्रार करतो. असा प्रकार गुरुवारी घडला. या प्रकारानंतर पोलिसांनी संबंधित मुलगी व तिच्या कुटुंबातील सदस्यांना विचारपूस करण्यासाठी आपल्यासोबत भिसी येथे नेले. मात्र पीडित मुलीच्या आजोबांनी आम्हाला भिसी येथे नेलेच नसल्याचे सांगितले. अर्ध्या रस्त्यातूनच आम्हाला परत गावी आणल्याचेही त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. याचाच अर्थ पोलिसांनी त्यांचे बयाण रस्त्यातच नोंदविले. मात्र पोलीस सांगत असलेल्या बयाणात आणि आधीच्या बयाणात तफावत दिसत असल्याने पोलिसांचीच भूमिका या प्रकरणात संशयास्पद दिसून येत आहे. विशेष म्हणजे, पीडित मुलीला, तिच्या आईला व आजोबाला पोलीस वाहनातून नेत असताना तिथे महिला पोलीस कर्मचारीदेखील नव्हती, अशीही माहिती आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे गेले कुठे?
गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी भिसी, शंकरपूर, खडसंगी, जांभूळघाट गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र यातील किती कॅमरे सुरू आहेत, हे माहीत नाही. हे कॅमेरे सुरू असल्यास संबंधित टाटा सुमो येताना किंवा पळताना निश्चितच या कॅमेऱ्यात येऊ शकेल.
संबंधित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचे बयाण नोंदविण्यात आले आहे. यामध्ये असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी कबूल केले. त्यामुळे गुन्हा नोंद करण्याची आवश्यकता नाही. शुक्रवारी जांभूळघाट येथे सर्चिंग ऑफरेशन राबविण्यात आले. जिथे प्रकार घडला त्या परिसरात नागरिकांची विचारपूस केली असता असा प्रकार घडला नसून या मार्गाने कोणतीही गाडी त्यावेळी गेली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
- प्रकाश राऊत,
ठाणेदार,पोलीस स्टेशन, भिसी.