शैक्षणिक विकासासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:09 PM2018-05-14T23:09:06+5:302018-05-14T23:09:17+5:30
शिक्षक हे विद्यार्थी घडवत असतात. विद्यार्थ्यांच्या विकासामुळेच सर्व देशाचा विकास होत असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शिक्षक हे विद्यार्थी घडवत असतात. विद्यार्थ्यांच्या विकासामुळेच सर्व देशाचा विकास होत असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात नुकतेच पार पडले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्यप्रमुख सल्लागार आर. जी. भानारकर होते. यावेळी आ. नाना श्यामकुळे, जि. प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, सावली पं. स. च्या सभापती छायाताई शेंडे, रवींद्र बोलीवार, सुमन कोलगंटीवार, नारायण कोटकर, विजय भोगेकर, अल्का ठाकरे, शालिनी देशपांडे, दीपक वर्हेकर, ओम साळवे, सुनीता इटनकर, हरीश ससनकर यांची उपस्थिती होती.
पहिल्या सत्रात सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शैक्षणिक परिसंवादात प्रशांत आर्वे यांनी ‘शिक्षणाला सामोरे जाताना’ या विषयावर मत व्यक्त केले. शैक्षणिक व सामाजिक कार्ये या विषयावर अल्का ठाकरे यांनी तर प्रास्ताविक व अहवाल वाचन हरीश ससनकर केले.
अधिवेशनात जिल्ह्यातील १५ तालुक्यातील १५ उपक्रमशील शिक्षकांना आबासाहेब पाटील शिक्षक गौरव पुरस्कार, दोन शिक्षकांना आर.जी. भानारकर शिक्षक संघटक पुरस्कार, सुधीर कुंभारे यांना पीडी दादा कदम कला क्रीडा गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले.