तीन कोटींच्या जप्त केलेल्या दारूवर फिरविले रोलर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:08+5:302021-06-01T04:21:08+5:30
घुग्घुस: २०१७ ते २०२० पर्यंतच्या कालावधीत विविध ठिकाणी धाडी घालून व गस्तदरम्यान घुग्घुस पोलीस, एलसीबी, उत्पादन शुल्क विभागाने जप्त ...
घुग्घुस: २०१७ ते २०२० पर्यंतच्या कालावधीत विविध ठिकाणी धाडी घालून व गस्तदरम्यान घुग्घुस पोलीस, एलसीबी, उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेल्या तीन करोड १८ लाख रुपये किमतीच्या दारूवर न्यायालयाच्या आदेशानुसार रोडरोलर चालवून ती नष्ट केली. यापूर्वी २८ ऑगस्ट २०१७ ला ६५ लाखांच्या दारूवर रोलर चालविला होता.
१ एप्रिल २०१५ ला झालेल्या दारूबंदी दरम्यान बाहेरून अवैधरित्या दारू तस्कराच्या माध्यमातून विविध मार्गाने जिल्ह्यात येणाऱ्या दारूला ठिकठिकाणी धाडी टाकून, गस्ती व गुप्तसूत्राकडून मिळालेल्या आधारे घुग्घुस पोलीस, एसपी, डीवायएसपी, एसडीपीओ, गुन्हे अन्वेषण, उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी धाडी टाकून ३८८ गुन्हे दाखल केले व तीन कोटी १८ हजारांची जप्त केलेली दारू गुप्ता कोलवाशरीच्या मागील रस्त्यावर रोलर फिरवून नष्ट केली. यावेळी ठाणेदार राहुल गांगुर्डे, उत्पादन शुल्क विभागाचे मारोती पाटील, घुग्घुसचे उमाकांत गौरकर, महेश कुंभारे, गजानन झाडे, सचिन बोरकर, विनोद लोखंडे, रामदास आळे, मनोहर धारणे, जगदीश कपाटे, रविकांत निमगडे यांची उपस्थिती होती.