कापसाच्या उभ्या पिकात रानडुकरांचा धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:46 PM2017-11-04T23:46:41+5:302017-11-04T23:46:51+5:30
कापसाचे पीक शेतकºयांच्या हाती येत असतानाच भरदिवसा रानडुकरांनी उभ्या पिकात धिंगाणा घातला आहे. शेतकºयांच्या डोळ्यादेखत पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : कापसाचे पीक शेतकºयांच्या हाती येत असतानाच भरदिवसा रानडुकरांनी उभ्या पिकात धिंगाणा घातला आहे. शेतकºयांच्या डोळ्यादेखत पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
मजुरांअभावी शेतात कापूस पडून असून आता फुटत चालला आहे. परंतु रानडुकरांकडून उभे पीक पूर्णत: भुईसपाट करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला असून वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणार कधी, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, ही गेल्या अनेक वर्षापासूनची शेतकºयांची मागणी आहे. परंतु वनविभाग याकडे लक्ष का देत नाही, हा खरा प्रश्न आहे. वनविभागाने जर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त केला तर शेतपिकांचे नुकसान तर होणार नाहीच. परंतु शेतकºयांना शासनाकडून शेतपिकांची नुकसान भरपाई मागण्याची वेळ येणार नाही. वनविभागाचे अधिकारी याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्याने वन्यप्राणी भरदिवसा उभ्या पिकात धुडगूस घालतात. परंतु त्याचे कोणतेही सोयरसुतूक वनविभागाला नाही, ही खरी शोकांतिका आहे. मग वनविभागाच्या अधिकाºयांसह वनविभागाचे कर्मचारी वर्षभर करतात तरी काय, असा प्रश्न जनमानसातून विचारला जात आहे.
राजुरा तालुक्यात वेकोलिच्या अनेक कोळसा खदानी असल्याने वेकोलिने कोळसा उत्खननासाठी मातीचे महाकाय ढिगारे निर्माण केले आहे. गोवरी, सास्ती, बाबापूर, पोवनी, साखरी परिसरात हे ढिगारे दिसून येतात. या महाकाय ढिगाºयालगत शेतकºयांची शेती आहे. मातीवर झुडूपी जंगल असल्याने रानडुकरांचे कळप येथे लपून बसतात. तेच कळप पिकांची नासाडी करीत आहेत.
शेतकºयांचा किती अंत पाहायचा ?
शेतकºयांना नेहमीच अस्मानी-सुल्तानी संकटाचा सामना करावा लागतो. शेतकºयांसाठी शासन अनेक योजना राबविते. परंतु कर्तव्यात कसूर करणाºया शासनाच्या बेजबाबदार अधिकाºयांनी शेतकºयांच्या योजना मातीत घातल्या आहेत. शेतकºयांनी शेतात दिवसरात्र राबणेच त्यांच्या नशिबी आले आहे.