अतिसार प्रतिबंधासाठी जिल्ह्यात रोटा व्हायरल लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:48 AM2019-08-04T00:48:31+5:302019-08-04T00:49:21+5:30

राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमात रोटा व्हायरस लस समाविष्ट करण्यात आली आहे. रोटा व्हायरसमुळे अतिसारापासुन बालकांचे संरक्षण होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला ही लस द्यावी, असे आवाहन जि. प. आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

Rota viral vaccination campaign in the district for the prevention of diarrhea | अतिसार प्रतिबंधासाठी जिल्ह्यात रोटा व्हायरल लसीकरण मोहीम

अतिसार प्रतिबंधासाठी जिल्ह्यात रोटा व्हायरल लसीकरण मोहीम

Next
ठळक मुद्देजि. प. आरोग्य विभाग। घुग्घुस येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमात रोटा व्हायरस लस समाविष्ट करण्यात आली आहे. रोटा व्हायरसमुळे अतिसारापासुन बालकांचे संरक्षण होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला ही लस द्यावी, असे आवाहन जि. प. आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने येथे स्थानिक वियाणी विद्या मंदिराच्या प्रांगणात मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना शामकुळे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत डॉ.गिरीश मैइंदरकर, वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक उदय कावळे, डॉ. रवी आलुरवार, आयएमए अध्यक्ष डॉ. किरण देशपांडे, प्राचार्य फादर रॉबर्ट निकोलस, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, विवेक बोढे, नितु चौधरी, संतोष नुने, निरीक्षण तांड्रा उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी मोहिमेची उपयोगीता सांगितली. जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे व आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Rota viral vaccination campaign in the district for the prevention of diarrhea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य