रोटरी क्लबतर्फे रुग्णालयात ग्रीन शीट व पाणपोईची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:29 AM2021-04-04T04:29:01+5:302021-04-04T04:29:01+5:30
बल्लारपूर : वस्ती विभागातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी येणाऱ्या वयोवृद्धांना उन्हात रांगेत राहून आपला नंबर लागण्याची वाट बघावी ...
बल्लारपूर : वस्ती विभागातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी येणाऱ्या वयोवृद्धांना उन्हात रांगेत राहून आपला नंबर लागण्याची वाट बघावी लागते. ही बाब लक्षात येताच रोटरी क्लब बल्लारपूर सामाजिक संस्थेच्या वतीने रुग्णालयासमोरील अंगणात ग्रीन नेट लावण्यात आली तसेच तहान भागविण्यासाठी पाणपोई सुरू करण्यात आली.
जनतेमध्ये कोरोना लसीकरणासंदर्भात संभ्रम आहे. अशावेळेस लस घेणाऱ्या नागरिकांनी सेल्फी पॉईंटद्वारे सेल्फी काढून सोशल मीडियावर अपलोड केल्याने इतरांना प्रोत्साहन मिळेल, विश्वास वाढेल, या अनुषंगाने रोटरी क्लबतर्फे हॉस्पिटल प्रांगणात सेल्फी पॉईंट स्थापित करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष हरीश शर्मा, मुख्याधिकारी विजय सरनाईक, आरोग्य सभापती एलय्या दाससरफ, डॉ. डांगे, रेणुका दुधे, संगीता उमरे, रोटरी बल्लारपूरचे अध्यक्ष वैभव मिनेवार, नीलेश चिमडलवार, मनीष मुलचंदानी, राहुल वरुण, राजू मुंदडा, प्रफुल्ल चरपे, उमेश पटेल, प्रशांत भोरे आदी उपस्थित होते.