चंद्रपुरात सुरू झाले डायलिसिस सेंटर; सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण
By साईनाथ कुचनकार | Published: May 26, 2023 06:41 PM2023-05-26T18:41:37+5:302023-05-26T18:42:06+5:30
Chandrapur News समाजातील गरीब रुग्णांना डायलिसीस उपचार माफक दरात उपलब्ध व्हावा यासाठी रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने येथील बुक्कावार हॉस्पिटलमध्ये रोटरी डायलिसीस सेंटर सुरू करण्यात आले आहे.
चंद्रपूर : समाजातील गरीब रुग्णांना डायलिसीस उपचार माफक दरात उपलब्ध व्हावा यासाठी रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने येथील बुक्कावार हॉस्पिटलमध्ये रोटरी डायलिसीस सेंटर सुरू करण्यात आले आहे. या रोटरी डायलिसीस सेंटरचे लोकार्पण राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्यपालन मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर, ग्लोबल पार्टनर रोटरी क्लब ऑफ बिराटनगर मिड टाऊन नेपाल व डॉ. बुक्कावार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी डायलिसीस सेंटर सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. किशाेर जोरगेवार, रोटरी क्लब ३०३० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. आनंद झुनझुनवाला, रोटरीचे आयपीडीजी रमेश मेहर, रोटरीचे पीडीजी महेश मोखलकर, रोटरी क्लब ३०३० चे माजी डिस्ट्रिक गव्हर्नर राजेंद्र भामरे, नाना शेवाळे, रोटरी क्लब चंद्रपूरचे अध्यक्ष अजय जयस्वाल, सचिव संतोष तेलंग, श्रीकांत रेशीमवाले, डॉ. अशोक वासलवार, अविनाश उत्तरवार , डॉ. अंबरीश बुक्कावार, मधुसूदन रुंगठा, प्रदीप बुक्कावार उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या डायलिसीस सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. रोटरी क्लबचे हे सेंटर समाजातील गोरगरीब लोकांच्या उपचारार्थ कामी येईल असे मुनगंटीवार म्हणाले. आमदार किशाेर जोरगेवार यांनी डायलिसीस सेंटरच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे सेवाकार्य समाजातील तळागाळापर्यंत पोहोचले आहे. डायलिसीस केंद्राचा उपक्रम अतिशय उत्तम असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक प्रदीप बुक्कावार, संचालन राजश्री मार्कंडेवार तर आभार संतोष तेलंग यांनी मानले. कार्यक्रमाला रोटरी क्बल ऑफ चंद्रपूर, रोटरी क्लब ऑफ चांदा फोर्ट, रोटरी क्लब राजुरा, बल्लारपूर, वरोरा, हिंगणघाटचे अध्यक्ष, सचिव, सदस्य तथा मान्यवर मंडळी उपस्थित होते.