ओबडधोबड रस्त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:28 AM2021-09-25T04:28:57+5:302021-09-25T04:28:57+5:30

नागमंदिर चाैकातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे व नालीचे बांधकाम मागील दीड वर्षापूर्वी करण्यात आले. अगदी ओबडधोबड पद्धतीने रस्ता व नाली ...

The rough roads increased the headaches of the citizens | ओबडधोबड रस्त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली

ओबडधोबड रस्त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली

Next

नागमंदिर चाैकातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे व नालीचे बांधकाम मागील दीड वर्षापूर्वी करण्यात आले. अगदी ओबडधोबड पद्धतीने रस्ता व नाली बांधल्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. तसेच दुचाकी वाहकांना तर जीव सांभाळून आडीमोळीने रस्त्यावरुन वाहन चालवावे लागते. यामध्ये कित्येक दुचाकी चालक नालीवरील झाकण चुकविण्याच्या नादात दुचाकीवरुन पडले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता व नाली डोकेदुखी ठरलेली आहे. नालीचे बांधकाम रस्त्याच्या एकदम मधोमध केलेले असून, त्यावर योग्य प्रकारची झाकणे घट्ट बसविलेली नाहीत. त्या झाकणांवरुन जाताना ते हलतात. पावसाळ्याच्या दिवसात तर दुचाकी घसरण्याचा धोका असतो. रात्री अशा रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

240921\img-20210924-wa0032.jpg

हाच तो रस्ता जो नागरिकांची डोकेदुखी ठरला आहे.

Web Title: The rough roads increased the headaches of the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.