कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी साडेचार कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:52 PM2018-10-24T22:52:11+5:302018-10-24T22:52:54+5:30

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर, पोंभुर्णा आणि मूल या तालुक्यात चार कोटी ५० लाख २१ हजार रुपये किमतीच्या कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाºयांचे बांधकाम मंजूर झाले आहे.

Rs. 4 crores sanctioned for Kolhapuri dam | कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी साडेचार कोटी मंजूर

कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी साडेचार कोटी मंजूर

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर, पोंभुर्णा आणि मूल या तालुक्यात चार कोटी ५० लाख २१ हजार रुपये किमतीच्या कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्यांचे बांधकाम मंजूर झाले आहे.
बल्लारपूर तालुक्यातील किन्ही येथे एक कोटी २० लाख ४३ हजार रुपये, पोंभुर्णा येथे ६७ लाख १० हजार रू., बल्लारपूर तालुक्यातील काटवली येथे ९९ लाख ५७ हजार रू., मूल तालुक्यातील केळझर येथे ८० लाख ९५ हजार आणि ८२ लाख १६ हजार रू. इतक्या किमतीचे दोन बंधारे याप्रमाणे एकूण पाच कोल्हापुरी बंधाºयांची कामे मंजूर झाली आहे. २३ आॅक्टोबर रोजी सदर कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्यांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जलसंधारण व त्याद्वारे पिकांना थेट संरक्षित पाण्याची सोय करणे तसेच परिसरातील जलस्रोतांचे पुनर्भरण करून, भूगर्भजल पातळी वाढण्यास मदत करणे यादृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण समजल्या जाणाºया कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाºयांची बांधकामे मंजूर झाल्यामुळे शेतकºयांना जलसिंचनाची योग्य सोय उपलब्ध झाली आहे.

Web Title: Rs. 4 crores sanctioned for Kolhapuri dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.